माता-पित्याच्या चरणी ब्रह्मांड पाहून त्यांना प्रदक्षिणा घालणार्याय श्री गणेशासम आपणही गुरुदेवांना शरण जाऊन साधनामार्गाची परिक्रमा पूर्ण करूया !

आपल्याला गुरुकृपायोग नुसार साधनामार्गाने पुढे नेणार्‍या महान परात्पर गुरुदेवांच्या चरणी शरणागत भावाने नमन करून, ज्याप्रमाणे गणपतीने माता-पित्याच्या चरणी ब्रह्मांड पाहून प्रदक्षिणा घातली, त्याप्रमाणे साधनामार्गाची परिक्रमा पूर्ण करूया.

हे गुरुदेवा, आपणच ज्ञानदाता आणि बुद्धीदाता आहात. आम्हाला सदैव आपले आज्ञापालन करण्याची जाणीव राहू द्या. तुम्ही जो व्यष्टी आणि समष्टी साधनेचा मार्ग दाखवला आहे, त्या मार्गावर परिक्रमा करण्यासाठी तुम्हीच आम्हाला शक्ती, भक्ती आणि बुद्धी प्रदान करा. आपला हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प आहे. त्यामध्ये आम्हा साधकांच्या बुद्धीचा सदुपयोग करवून घ्या.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अनंत कोटी नमन !

– कु. सर्वमंगला मेदी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


Multi Language |Offline reading | PDF