म्यानमारमधील हिंसाचारामुळे १८ सहस्र रोहिंग्या मुसलमानांचे बांगलादेशात पलायन

कॉक्स बाजार (बांगलादेश) – म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमान आतंकवादी आणि सैन्य यांच्यातील संघर्षामुळे गेल्या एका आठवड्यात सुमारे १८ सहस्र रोहिंग्या मुसलमानांनी बांगलादेशात पलायन केले आहे. गेल्या वर्षातील ऑक्टोबरपासून सुमारे ८७ सहस्र रोहिंग्यांनी बांगलादेशात आश्रय घेतलेला आहे; मात्र बांगलादेशच्या सीमा सुरक्षा दलाकडून रोहिंग्यांना सीमेवरूनच हाकलून लावण्यातही येत आहे.

स्थलांतरितांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या प्रवक्त्या संजुक्ता सहानी यांनी सांगितले की, म्यानमारचे सैनिक रोहिंग्या आतंकवाद्यांच्या आक्रमणांना प्रत्युत्तर देतांना गावेच्या गावे जाळून भस्मसात करत आहेत आणि रोहिंग्यांवर गोळीबार करत आहेत. म्यानमार सरकारने या अराजकासाठी रोहिंग्यांना उत्तरदायी ठरवले आहे.

म्यानमारमध्ये सुमारे १० लाख रोहिंग्या रहात आहेत. त्यापैकी बहुतांश संख्या राखीने प्रांतात आहे. मागील आठवड्यात रोहिंग्यांनी पोलीस चौक्यांवर आक्रमण केले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now