सनातनच्या कार्यास साहाय्य करण्यास सदैव तत्पर ! – प्रमोद कोंढरे, अध्यक्ष, बाजीराव रस्ता नातूबाग मित्र मंडळ

बाजीराव रस्ता (पुणे) येथे गणेशोत्सवानिमित्ताने प्रबोधन कक्षाचे उद्घाटन

नारळ वाढवतांना मध्यभागी श्री. प्रमोद कोंढरे, उजवीकडे श्री. सुनील घनवट आणि श्री. कोंढरे यांच्या बाजूला श्री. भागवत

पुणे, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – गेली ८ वर्षांहून अधिक काळ मी गणेशोत्सवाच्या काळात बाजीराव रस्त्यावर सनातनचा प्रबोधन कक्ष कायम पाहिला आहे. या प्रबोधन कक्षाच्या माध्यमातून जागृती होणार असून आम्ही सनातनच्या कार्यास साहाय्य करण्यास सदैव तत्पर आहोत. कधीही कोणतेही साहाय्य लागल्यास आवर्जून सांगा, असे प्रतिपादन बाजीराव रस्ता नातूबाग मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि कसबा मतदारसंघाचे भाजपा सरचिटणीस श्री. प्रमोद कोंढरे यांनी केले. येथील बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानासमोर गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या प्रबोधन कक्षाचे उद्घाटन श्री. कोंढरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी श्री. कोंढरे यांचे सहकारी श्री. अमित भागवत, समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ज्योती दाते यांनी, तर श्री. कोंढरे यांची ओळख श्री. घनवट यांनी करून दिली.

वैशिष्ट्यपूर्ण

श्री. कोंढरे यांनी प्रबोधन कक्षाची पाहणी केल्यावर काही सात्त्विक उत्पादने खरेदी केली. त्यानंतर ते म्हणाले की, अशा प्रकारचा प्रबोधन कक्ष पुढच्या वर्षी आमच्या मंडळाजवळ चांगला लावूया.

प्रबोधन कक्षात काय पहाल ?

१. श्री गणेशपूजन आणि आचारधर्म यांविषयी धर्मशिक्षण देणारे फलक

२. सनातनची विविध सात्त्विक उत्पादने

३. सनातन-निर्मित राष्ट्र, धर्म, आयुर्वेद अशा विविध विषयांवरील ग्रंथ

४. विविध देवतांच्या नामपट्ट्या, पदके

५. सनातन पंचांग २०१८

गणेशोत्सवानिमित्त ३ सप्टेंबरपर्यंत प्रबोधन कक्ष

स्थळ – महाराणा प्रताप उद्यानासमोर, बाजीराव रस्ता, पुणे.

वेळ – सकाळी ९ ते रात्री १०


Multi Language |Offline reading | PDF