जळगाव येथे धर्मांधांनी श्री गणेशमूर्तीचे भंजन केल्यामुळे तणावाचे वातावरण

हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी धर्मांधांकडून वारंवार होणारी आक्रमणे रोखू न शकणारे शासनकर्ते हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

धर्मांधांनी मूर्तीचे तोडलेले हात गोलात दाखवण्यात आले आहेत.

जळगाव, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – शहरातील रथचौकातील झुंझार गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशमूर्तीचे दोन हात काही धर्मांधांनी लोखंडी सळईने तोडले. त्यामुळे जुने जळगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे धर्मांध एका रिक्शातून या ठिकाणी आले होते. धर्मांधांनी मंडपात रिक्शा घालून नासधूस केली. श्री गणेशमूर्तीचे भंजन करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, यासाठी गणेशभक्तांनी जिल्हाधिकार्‍यांना विनंती केली आहे. (केवळ विनंती नको, त्या धर्मांधांवर कठोरात कठोर कारवाई होईपर्यंत संघटितपणे प्रयत्न करा ! – संपादक) या प्रकरणी ४ धर्मांधांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

या घटनेनंतर परिसरातील हिंदू संघटित झाले. त्यामुळे त्या ठिकाणी रहाणार्‍या धर्मांधांनी घराला कुलूप लावून पळ काढला आहे. या कालावधीत भाजपाचे आमदार श्री. राजुमामा भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, गणेशोत्सव महामंडळांचे श्री सचिन नारळे, बजरंग दलाचे संयोजक श्री. ललीत चौधरी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन सांगळे यांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून हिंदूंना शांततेचे आवाहन करत गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसह भग्न पावलेल्या श्री गणेशमूर्तीचे महानगरपालिकेच्या वाहनातून शहरातील मेहरूण तलावात विसर्जन केले आहे.

या चित्राद्वारे कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसून केवळ विटंबना काय केली आहे, ते समजावे यासाठी चित्र प्रकाशित करत आहोत. – संपादक

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now