उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समिती स्थापन

मुंबई – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर नाशिक जिल्ह्यातील मौजे गोंदेदुमाला येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूमीचा घोटाळा केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी पावसाळी अधिवेशनात केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे माजी अपर मुख्य सचिव के.पी. बक्षी यांची एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. बक्षी हे गेल्या १५ वर्षांतील महामंडळातील भूमींविषयी घेतलेले निर्णय पडताळणार आहेत. या समितीसाठी कोणतीही कालमर्यादा निश्‍चित करण्यात आलेली नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या निर्णयावर टीका करतांना म्हटले आहे की, ही समिती म्हणजे मंत्र्यांना वाचवण्याचा एक प्रकारचा हा प्रयत्नच आहे. (गेल्या १५ वर्षांतील स्वतःच्या सत्ता काळातील भूमीचे घोटाळे बाहेर येतील म्हणून ही आगपाखड करण्यात येत आहे, असे कुणाला वाटले, तर नवल ते काय ? – संपादक)

 


Multi Language |Offline reading | PDF