रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅलीचा हिंदु धर्मविरोधी उपक्रम : दान केलेल्या श्री गणेशमूर्ती पुढील वर्षी भाविकांना परत देणार !

सांगली – डॉल्फिन नेचर क्लब आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा नदीच्या घाटावर हिंदुधर्मविरोधी गणेशमूर्तीदान अभियान राबवण्यात आले. या अभियानात सुमारे ८८ मूर्ती दान मिळाल्या असे समजते. दान घेतलेल्या या मूर्तींना क्रमांक देण्यात आले असून भाविकांना या मूर्ती पुढील वर्षी परत देण्यात येणार आहेत. (देवाला दान द्यायला आपण त्याच्यापेक्षा मोठे झालो का ? श्री गणेशमूर्ती म्हणजे काही खेळणे नव्हे की जे दान देता येते. अध्यात्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीचे विसर्जनच व्हायला हवे. वहात्या पाण्यात विसर्जन करणे हा श्री गणेशपूजनातील शेवटचा विधी आहे. अशाप्रकारे मूर्ती दान घेऊन पुढच्या वर्षी देणे हे पूर्णत: शास्त्राच्या विरुद्ध आहे ! – संपादक) त्यासाठी ज्यांच्याकडून मूर्ती दान घेतली त्यांच्याकडून आवेदन भरून घेण्यात आले आहे. या उपक्रमास महापालिकेचा पाठिंबा असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. (धर्मविरोधी उपक्रमांना पाठिंबा देणारी महापालिका ! – संपादक)

कृष्णा नदीत वर्षभर कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी मिसळते, तसेच महापालिकेचे शेरीनाल्याचे पाणी मिसळते, नदीकाठी अनेक जण कपडे धुतात, तसेच काहीजण गुरेही धुतात. कृष्णा नदीत काही साखर कारखान्यांचे पाणीही मिसळते. असे असतांना वरील संघटना या नदीत होणार्‍या प्रदूषणाविषयी कधीही आवाज उठवतांना दिसत नाहीत, तर भुईछत्रीप्रमाणे हिंदूंच्या केवळ गणेशोत्सवाच्या वेळीच उगवतात. याविषयीही भाविकांमधून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व संघटना आता बकरी ईदच्या निमित्ताने मातीची बकरी कापा, तसेच मुसलमान बांधवांकडून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न करणार आहेत का ?, असाही प्रश्‍न भाविकांमधून उपस्थित केला जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF