दाऊद कराचीत असेलही; पण त्याला पकडून भारताच्या कह्यात देण्याचे सौजन्य का दाखवावे ? – परवेझ मुशर्रफ

भारतीय नागरिकांच्या हत्यांना उत्तरदायी असणार्‍यांना पाक भारताच्या कह्यात देऊ इच्छित नाही, तरीही भारतातील पाकप्रेमी पाकशी मैत्री करावी, चर्चा करावी, क्रिकेट खेळावे, असे सांगतात !

इस्लामाबाद – भारताने नेहमीच पाकवर आरोप केला आहे; पण आम्ही दाऊद इब्राहिम याला पकडून भारताला देण्याचे सौजन्य का दाखवावे ? दाऊद कराचीत असेल किंवा अन्य कुठे, भारतात मुसलमानांची हत्या होते आणि यावर दाऊद प्रत्युत्तर देतो, असे विधान पाकचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी केले आहे. या विधानावरून दाऊद पाकमध्ये आहे, हे स्पष्टच होत आहे.

ओसामा बिन लादेनच्या वेळीही पाकने दावा फेटाळला होता; मात्र पाकमधील अबोटाबादमध्ये तो लपून बसला होता हे अमेरिकेच्या कारवाईनंतर स्पष्ट झाले. याकडे मुशर्रफ यांचे लक्ष वेधण्यात आले असता ते म्हणाले, गुप्तचर यंत्रणेला ओसामा बिन लादेनविषयी माहिती नव्हती. अबोटाबादमध्ये रहाणारी व्यक्ती ओसामा होती याची माहिती कोणालाही नव्हती. ती अमली पदार्थाची तस्करी करणारी व्यक्ती असावी, असे स्थानिकांना वाटत होते. ओसामा अबोटाबादमध्ये ५ वर्षांपासून रहात होता, या दाव्यावर मलादेखील शंका आहे. (अमेरिकेने लादेनवर पाकमध्ये घुसून कारवाई केली; भारत दाऊदवर कधी करणार ? – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now