राममंदिराच्या उभारणीसाठी शिया आणि सुन्नी संघटनांचे आंदोलन

राममंदिराच्या उभारणीसाठी आंदोलन करणार्‍या शिया आणि सुन्नी संघटनांचे अभिनंदन ! त्यांनी असे आंदोलन यापूर्वीच करायला हवे होते !

लक्ष्मणपुरी – रामजन्मभूमीवर राममंदिराची उभारणी आणि मुसलमानबहुल भागात मशिदीची उभारणी होण्याच्या मागणीसाठी नुकतीच येथे शिया आणि सुन्नी संघटनांनी आंदोलन केले. यानंतर त्यांनी राज्यपालांना निवेदन दिले. तसेच त्यांनी शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांना सुरक्षा देण्याची मागणी केली. ऑल इंडिया शिया मंच आणि सुन्नी सीरत काऊन्सिल यांनी एकत्र येऊन येथील हजरतगंजच्या गांधी पार्कमध्ये हे आंदोलन केले.

शिया मंचचे अध्यक्ष खुर्शीद आगा म्हणाले की, शिया वक्फ बोर्डने सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात येथे राममंदिर निर्माण करण्यास सांगितले आहे. याचे मी समर्थन करतो. रामजन्मभूमीचा वाद अनावश्यक आहे. अयोध्येत अनेक मशिदी आहेत, तरीही बाबरी मशिदीला महत्त्व देऊन बहुसंख्य समाजाच्या भावना दुखावण्यात येऊ नयेत.


Multi Language |Offline reading | PDF