(म्हणे) राज्यव्यवस्थेची सनातनला हात लावण्याची हिंमत होत नाही !

महाराष्ट्र १ वृत्तवाहिनीचे संपादक तथा निवेदक आशिष जाधव यांचा कांगावा

महाराष्ट्र १ वृत्तवाहिनीवरील चर्चासत्र

सनातन संस्थेच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत, हे शासन आणि अन्वेषण यंत्रणा यांनी वारंवार सांगूनही सनातनची नाहक अपकीर्ती करणारे ‘महाराष्ट्र १’ वृत्तवाहिनीचे सनातनद्वेषी संपादक आशिष जाधव आदर्श पत्रकारिता कशी करणार ?

आशिष जाधव ‘महाराष्ट्र १’चे निवेदक आहेत कि धर्मद्रोही अंनिसचे प्रवक्ता ?

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर हे अंनिसच्या भ्रष्टाचाराचे सूत्र मांडत असतांना अंनिस कशी निष्कलंक आहे, हे सांगण्याचा आटापिटा आशिष जाधव करत होते.

मुंबई, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येचे धागेदोरे सनातनपर्यंत जात आहेत. सनातनवर बंदी घालण्याची मागणी होत आहे; मात्र राज्यव्यवस्थेची सनातनला हात लावण्याची हिंमत होत नाही. सनातनच्या गोवा येथील आश्रमापर्यंत पोलीस आणि सी.बी.आय. गेले; मात्र काहीच झाले नाही. सनातनला हात लावायची भाषा जरी केली, तरी त्यांना बाजूला करण्यात येईल, असे विधान २८ ऑगस्टला महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवरील बाबा राम रहीमसारख्यांचे प्रस्थ वाढवण्यास राजकीय व्यवस्थाच उत्तरदायी आहे का ?, या विषयावरील चर्चासत्रात वृत्तवाहिनेचे संपादक तथा निवेदक आशिष जाधव यांनी केले. (सनातनच्या विरोधात काही पुरावेच नसतील, तर बलपूर्वक सनातनला दोषी ठरवावे, अशी संपादक महोदयांची अपेक्षा ही असहिष्णूता नव्हे का ? – संपादक) मूळ विषय बाजूला सारून आणि पूर्वग्रह ठेवून निवेदक आशिष जाधव यांनी सनातनवर टीका केली. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांची तुलना बाबा राम रहीम यांच्याशी करून त्यांना भोंदूबाबा ठरवण्याचा प्रयत्न जाधव यांनी केला. (निवेदकाप्रमाणे तटस्थ भूमिकेतून प्रश्‍न विचारायला हवेत, याचे भान न रहाता स्वत: न्यायाधीश असल्याप्रमाणे निष्कर्ष काढणारे निवेदक समाजाला दिशा काय देणार ? – संपादक)

देशाला कुणापासून धोका आहे, हे आतापर्यंतचा इतिहास पाहिल्यास किंवा आतंकवादी आक्रमणांच्या घटनांचा अभ्यास केल्यास मिठीबोरवाला यांच्यासारख्या धर्मांधांना लक्षात येईल. संतांपासून देशाला कधीही धोका नव्हता, उलट संतांनी आतापर्यंत राष्ट्र आणि धर्म रक्षणाचेच कार्य केले आहे !

(म्हणे) डॉ. आठवले यांचा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाला धोका ! – तथाकथित अभ्यासक फिरोज मिठीबोरवाला

तथाकथित अभ्यासक फिरोज मिठीबोरवाला यांनी या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा एकेरी नावाने उल्लेख करत त्यांची तुलना आतंकवादी डॉ. झाकिर नाईक यांच्याशी केली. मिठीबोरवाला म्हणाले, दिग्विजय सिंह यांनी डॉ. झाकिर नाईक यांना चांगले प्रवक्ता म्हटले आहे. झाकिर नाईक याच्याप्रमाणे गोव्यात जो आठवले बसला आहे, त्याचा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाला धोका आहे. (राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी निःस्वार्थी वृत्तीने कार्य करणारे आणि समाजाला साधनेचे महत्त्व पटवून देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर धादांत खोटे आरोप करून त्यांची नाहक अपकीर्ती करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई होण्यासाठी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे ! – संपादक)

धर्म ही संकल्पना आत्मोत्थानासाठी ! – भाजपचे प्रवक्ता अवधूत वाघ यांची स्पष्ट भूमिका

काही दुष्ट प्रवृत्तींनी धर्मामध्ये शिरून धर्माला अपकीर्त करण्याचे काम केले आहे. धर्माच्या नावाखाली अधर्माने वागतात त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. जे धर्माच्या नावाखाली अधर्माची कृत्ये करणारे अधर्मवादी असतात. त्यामुळे कुणी धर्माला दुषण देऊ नये. धर्म ही एक आदर्श संकल्पना आहे. अनेक थोरमहात्म्यांनी धर्माचे पालन करून अनेकांना सन्मार्गाला लावले आहे. धर्म ही संकल्पना आत्मोत्थानासाठीच आहे.

केवळ हिंदु धर्मावर टीका करणे, हाच पुरोगाम्यांचा सर्वधर्मसमभाव का ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

हिंदु धर्माचे सण-उत्सव यांना केवळ लक्ष्य केले जाते. डॉ. झाकिर नाईक याच्यावर प्रथमदर्शी अहवाल प्रविष्ट झाली, तेव्हा त्याला तेवढी प्रसिद्धी दिली गेली नाही; मात्र हिंदु धर्मातील संतांना लगेच अपकीर्त केले जाते. हिंदूंचे सण आले की, पुरोगामी मंडळी विविध आवाहने करतात. एक गाव एक गणपति ही संकल्पना राबवण्याचे आवाहन करण्यात येते, तर मग बकरी ईदच्या वेळी एक गाव एक बकरी अशी संकल्पना मांडायला मात्र कोणी धजावत नाहीत, हा पुरोगाम्यांचा सर्वधर्मसमभाव आहे का ?


Multi Language |Offline reading | PDF