ब्राह्मणपुरी परिसरात माकडे आणि भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांचा उच्छाद : नागरिक त्रस्त !

सुस्त आणि दायित्वशून्य महापालिका प्रशासन !

मिरज, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – शहरातील ब्राह्मणपुरी परिसरात सध्या माकडांच्या उच्छादाने नागरिक त्रस्त झाले आहेत. ही माकडे टोळ्यांनी येतात आणि नागरिकांच्या थेट घरात जाऊन वस्तू उचलून नेतात, तसेच वस्तूंचीही हानी करत आहेत. माकडांनी काहींच्या घरी कुंड्या, हस्तप्रक्षालनही फोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्याचसमवेत भटक्या कुत्र्यांचा त्रासही ब्राह्मणपुरी परिसरास मोठ्या प्रमाणात होत आहे. पहाटे ही कुत्री फिरावयास जाणार्‍या लोकांच्या मागे लागतात, तसेच लहान मुलांच्याही मागे लागतात. कुत्री आणि माकडे यांमुळे नागरिक आणि विशेषकरून लहान मुले यांच्या जिवास धोकाही निर्माण होऊ शकतो. माकडे आणि कुत्री यांच्या त्रासामुळे ब्राह्मणपुरीतील नागरिक त्रस्त झाले असून प्रशासन मात्र सुस्त आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून या दोघांचाही बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.


Multi Language |Offline reading | PDF