धाराशिव येथील गणेशोत्सव मंडळांना मूर्तीविसर्जन न करण्याचा अशास्त्रीय निर्णय घेण्यास भाग पाडले !

गणेशोत्सव मंडळांची दिशाभूल

गणेशोत्सव मंडळांनो, आता विसर्जन नको म्हणणारे उद्या श्री गणेशमूर्तीचे पूजनही करू नका म्हणतील, हे लक्षात घ्या !

धाराशिव – येथे जलप्रदूषण, अवास्तव खर्च, देवतेची विटंबना होते, अशी कारणे पुढे करून या वर्षीही शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. विषारी पीओपी(प्लास्टर ऑफ पॅरिस)मुळे होणारे पाण्याचे प्रदूषण यामुळे टळले आहेे, असे मंडळांनी म्हटले आहे. (श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे पाण्याचे प्रदूषण होत नाही, तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे जलप्रदूषण न्यून झाल्याचे अहवाल आहेत. शास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करणे, हा त्याच्या पूजाविधीतील शेवटचा विधी आहे. विधीपूर्वक पूजन केलेली आणि प्राणप्रतिष्ठापना केलेली श्री गणेशमूर्ती तशीच ठेवल्यास उलट तिची विटंबना होण्याचीही शक्यता आहे ! – संपादक)

दिव्य मराठी या दैनिकाने याविषयी तथाकथित उपक्रम राबवून गणेशोत्सव मंडळांची दिशाभूल करून त्यांना विसर्जन न करण्याविषयी प्रबोधन केले होते. विसर्जनावर होणार्‍या खर्चातील उरलेल्या रकमेतून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (गणेशोत्सवाचा मूळ उद्देश भक्तीभाव वाढवणे हा आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी अत्यल्प खर्चात आदर्श मिरवणूक काढत श्री गणेशमूर्तीचे भक्तीभावाने विसर्जन करून तो हेतू साध्य केला पाहिजे !  – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF