जालना विद्युत उपकेंद्राला कुलूप ठोकून गावकर्‍यांचे आंदोलन

कुंभार पिंपळगाव (जि. जालना), ३१ ऑगस्ट (वार्ता.) – गौरी-गणपति सणांच्या तोंडावर गावातील आठ विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याने गाव अंधारात आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून त्रासलेल्या गावकर्‍यांंनी येथील ३३ के.व्ही. उपकेेंद्र  कुलूप लावून बंद केली. यामुळे ३२ गावांचा वीजपुरवठा बंद झाला आहे. गावातील रोहित्र जोपर्यंत येत नाहीत, तोपर्यंत उपकेंद्र बंद ठेवण्याची चेतावणी देण्यात आली आहे. (विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याचे कारण शोधून त्यामध्ये दोषी असणार्‍यांवर शासनाने दोषींना शिक्षा करावी. हिंदूंच्या सणांच्या वेळी विद्युतपुरवठा नीट होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF