निगडी (पुणे) येथे अज्ञातांकडून ५ चारचाकी गाड्यांची तोडफोड

असुरक्षित पुण्यातील वाहनांची तोडफोड कधी थांबणार ?

पिंपरी (पुणे) – येथील निगडी भागातील बौद्धनगर झोपडपट्टी परिसरात अज्ञातांनी ५ रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी गाड्यांची तोडफोड २९ ऑगस्टला मध्यरात्री केली आहे. त्या गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या असून मोठी आर्थिक हानी झाली आहे. निगडी पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे. पिंपरी-चिंचवड भागातील सांगवी, पिंपळे गुरव, नेहरूनगर, साने चौक अशा विविध भागांत गेल्या काही मासांत यापूर्वी दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची तोडफोड करण्याचे प्रकार झाले आहेत. (कायद्याचा धाक संपल्याचे लक्षण ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF