हिंदूंवर कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस ३६५ दिवस मशिदींवर अजान चालू करण्याविषयी परवान्याची चौकशी करत नाहीत ! – संजय पवार

हिंदूंच्या सणांवर पोलिसी दडपशाहीच्या विरोधात विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयावर शिवसेनेचा भर पावसात भव्य मोर्चा !

आज पहाटे मशिदींवरील अजान बंद होण्यासाठी प्रबोधन करणार !

कोल्हापूर, ३० ऑगस्ट (वार्ता.) – प्रतीदिन ५ वेळा असे वर्षातील ३६५ दिवस मशिदींवरील भोंग्यातून अजान दिली जाते. या अजानमुळे लोकांना त्रास होतो, मशिदींवर अजान देण्यासाठी मुसलमानांकडे परवाने आहेत का ? याची पोलीस साधी चौकशीही करत नाहीत. याच्या उलट हिंदु धर्मातील सण आणि उत्सवाच्या वेळी हिंदूंना कायद्याचा बडगा दाखवून हिंदु तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, असे वर्तन पोलिसांकडून केले जाते. हे कदापी सहन केले जाणार नाही. हिंदूंचे सण थाटामाटात साजरे करा, अशी शिवसेनाप्रमुखांची भूमिका होती. त्यानुसार आम्ही सण थाटामाटात साजरे करू. हा कायदा सर्व धर्माला लागू केला पाहिजे. मंडप आणि ध्वनीक्षेपक यंत्रणा अनुमतीसाठी येणार्‍या हिंदूंना प्रमाणपत्र देण्यासाठी सतत हेलपाटे मारायला लावले जातात. हिंदूंच्या सणांच्या वेळी आडकाठीची भूमिका घेतल्यामुळे पोलिसांसमवेत आमचा संघर्ष चालू झाला आहे. समाजात तेढ निर्माण करण्याची आमची इच्छा नाही; मात्र हिंदूंच्या सणांवेळी पोलिसांनी हिंदूंवर कायद्याचा बडगा उगारल्यास त्यांना ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल, अशी चेतावणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार यांनी येथे दिली.

हिंदूंच्या सणांवर पोलिसांकडून होणार्‍या दडपशाहीच्या विरोधात ३० ऑगस्टला शिवसेनेच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. ताराबाई पार्कमधील पितळी गणपति मंदिरापासून निघालेला मोर्चा पोलिसांनी गोकुळ दूध उत्पादक संघ कार्यालयासमोर अडवला. पोलीस अधिकारी चर्चेस सिद्ध होते; मात्र शिवसेना नेते भाषणे झाल्यावर परतले. या वेळी मंदिरात ५ आरत्या करण्यात आल्या.

कोल्हापूर येथे अवैध धंद्यांवर पोलिसांकडून जाणीवपूर्वक कारवाई नाही ! – विजय देवणे

श्री. विजय देवणे म्हणाले की, कॉ. पानसरे प्रकरणातील खर्‍या आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आल्यामुळे त्यांनी आरोपींना पकडण्यासाठी १० लक्ष रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. मटका, दारू अड्डे, जुगार असे अवैध धंदे सर्रासपणे चालू आहेत. त्याकडे पोलिसांना लक्ष द्यायला वेळ नाही. जाणीवपूर्वक अशा अवैध धंद्यांवर कारवाई केली जात नाही. सावकारी जोमात चालू असून त्यातून गरीबांची पिळवणूक चालू आहे. पोलीस आम्हाला डॉल्बी लावून बघा, अशी धमकी देतात. बघा म्हणजे काय ? लाठ्यांनी मारणार कि आमच्यावर गोळ्या झाडणार ?

श्री. संजय पवार म्हणाले की, पुण्यात छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी असलेल्या वडूबुद्रक गावाजवळ आयोजित केलेल्या सनबर्न मेजवानीच्या वेळी अमली पदार्थ, मद्य आणि डिजे ध्वनीक्षेपक यंत्रणा यांचा सर्रास वापर करण्यात आला. तरीही पोलिसांनी यातील दोषींवर काहीच कारवाई केली नाही. सनबर्नच्या मेजवानीला कोणी विरोध करू नये म्हणून तेथे कमांडो नेमण्यात आले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now