डोकलाम येथे रस्ता बांधणीचे काम चीन पुन्हा चालू करणार

भारत आणि चीन यांनी डोकलाम येथून सैन्य मागे घेतल्याने भारताचा कुटनीतीद्वारे विजय झाल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र हा पराभव आहे, असे चीनच्या भूमिकेवरून लक्षात येते ! चीनचे सैन्य तेथून परत गेलेले नाही आणि तो रस्त्याचे काम कायमचे बंदही करणार नाही, असे त्यानेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारत सरकारने याविषयी स्पष्टीकरण देणे आवश्यक !

बीजिंग – सीमेचे रक्षण, जीवनमान उंचावणे यांसाठी रस्ते बांधणी चालू असून चीनने रस्ते बांधणीत फार पूर्वीपासून काम चालू केले आहे, असे विधान चीनच्या परराष्ट्र प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी केलेे. चीन डोकलाममध्ये रस्ते बांधणीचे काम चालू ठेवणार का ?, असे चुनयिंग यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सर्व गोष्टींचा विचार यात करावा लागेल. त्यात हवामानाचाही समावेश आहे. त्यासाठी परिस्थिती बघून आराखडा ठरवावा लागेल. सध्या चीनच्या सीमेवरील सैनिक डोकलाम भागात गस्त चालूच ठेवतील. आम्ही आमचे सार्वभौमत्व सुरक्षित ठेवू इच्छितो.

१. ब्रिक्स (ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका) देशांच्या परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर रस्ते बांधणीचे काम थांबवले आहे का ?, या प्रश्‍नावर चुनयिंग यांनी सांगितले की, राजनैतिक मार्गाने शांततामय तोडगा काढणे हिताचे आहे. आताच्या घडामोडीतून चीन एक प्रमुख देश म्हणून दायित्वाने भूमिका बाजावत आहे, असे दिसून येते.

२. चीनने भूतानशी काही सल्लामसलत केली आहे का ?, या प्रश्‍नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. भूताननेही डोकलाममध्ये चिनी सैन्याने चालू केलेल्या रस्तेबांधणीला विरोध केला होता. त्यावरूनच भारताने भूतानच्या रक्षणासाठी येथे सैनिक तैनात केले होते.

३. भारतीय सैन्य आमच्या सीमेमध्ये घुसले होते. ते माघारी गेल्याने प्रश्‍न सुटला आहे, असे चुनयिंग यांनी या वेळी स्पष्ट केले. आमचे सैन्य तेथेच आहे. उलट भारताने सैन्य माघारी घेण्यास चालू केले आहे, असा दावा चीनने केला.

(म्हणे) भारताने डोकलामवर चीनचे नियंत्रण मान्य केल्याने सैन्य मागे घेतले ! – ग्लोबल टाइम्सचा दावा

भारताने सैन्य माघारी घेतांना काही प्रश्‍नांची उत्तरे दिलेली नसल्याने हा दावा खरा आहे, अशी शंका उपस्थित होते !

बीजिंग – डोकलामविषयी सत्य हे आहे की, २८ ऑगस्टला भारताने सैन्य माघारी बोलवले. यावरून नवी देहलीने मान्य केले आहे की, डोकलामवर खरे नियंत्रण चीनचे आहे. भारतात सध्याच्या घडीला राष्ट्रवादाच्या भावना टोकदार आहेत. त्यामुळे मोदी सरकारला भारतीय सैनिकांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेणे तेवढे सोपे नव्हते, असा दावा चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या संपादकीय लेखात करण्यात आला आहे.

यात पुढे म्हटले आहे की,

१. डोकलाम वादावर भारताकडून असे भासवण्यात येत आहे की, नवी देहलीने फार कुशलतेने आणि मुत्सद्दीपणे हा वाद मिटवला आहे. चीन याचे खंडन करत नाही. बीजिंगचीही अशी इच्छा नव्हती की, भारतीय सैनिक पराभूत चेहर्‍याने मागे फिरावे.

२. काही भारतीय माध्यमांनी डोकलाम वादावर भारताचा विजय झाला असल्याचा दावा केला आहे. काही वृत्तांमध्ये भारताचा वरचष्मा राहिल्याचे सांगितले गेले; मात्र चीनने या प्रकरणात संयम राखला आणि भारताला होणार्‍या त्रासापासून वाचवले.


Multi Language |Offline reading | PDF