धार्मिक उत्सवांच्या निमित्त फटाके वाजवून इतरांना त्रास देणार्‍यांवर देव कधीतरी कृपा करील का ?

धार्मिक उत्सवांच्या निमित्त मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या किमतीचे फटाके वाजवणे, हे भूषण असल्याचे समजणार्‍यांनो, पुढील गोष्टींचा अंतर्मुख होऊन विचार करा !

(पू.) श्री. संदीप आळशी

१. मोठ्या प्रमाणात वाजवण्यात येणार्‍या फटाक्यांमुळे प्रचंड ध्वनीप्रदूषण आणि वायूप्रदूषण होते. समष्टीची हानी करणार्‍या या पापाचे धनी का होता ?

२. रात्री उशिरापर्यंत वाजवण्यात येणार्‍या फटाक्यांमुळे इतरांची झोपमोड होऊन त्यांना मानसिक त्रास सोसावा लागतो. अशा प्रकारे इतरांना त्रास देऊन उत्सव साजरा करणार्‍यांवर देव कधीतरी कृपा करील का ?

३. हिंदूंनी रात्री उशिरापर्यंत फटाके वाजवल्याने मुसलमान पहाटे बांग देऊन सर्वांची झोपमोड करतात, हे अयोग्य आहे, असे हिंदूंना सांगण्याचा अधिकार रहातो का ?

४. फटाके वाजवून पैशांचा चुराडा करण्यापेक्षा ते पैसे राष्ट्रातील अर्धपोटी जनतेला दिले किंवा राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी अर्पण केले, तर देव खचितच कृपा करील ना !

राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी बांधवांनो, धार्मिक उत्सवांच्या निमित्त हिंदु बांधवांकडून अन् उत्सव मंडळांकडून होणार्‍या वरील चुकीविषयी त्यांचे प्रबोधन करा ! आवश्यक वाटल्यास याविषयी हिंदु जनजागृती समिती तुम्हाला साहाय्य करील ! नियमबाह्य फटाके वाजवण्यात येत असतील, तर त्याविषयी पोलिसांकडे रीतसर गार्‍हाणे मांडा (तक्रार करा) !

धार्मिक उत्सव साजरा करणे, हे जसे हिंदूंचे पवित्र धर्मकर्तव्य आहे, तसेच धार्मिक उत्सवांतील अपप्रकार रोखणे, हेही हिंदूंचे पवित्र धर्मकर्तव्यच आहे !

– (पू.) श्री. संदीप आळशी (३०.८.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF