शासनाने सर्वच क्षेत्रांतील भोंदूगिरीच्या विरोधात कारवाई करायला हवी ! – शंभू गवारे, प्रवक्ता, सनातन संस्था

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरील हिम्मतवालीला सलाम चर्चासत्र

श्री. शंभू गवारे

मुंबई, ३० ऑगस्ट (वार्ता.) – भोंदूगिरी ही सर्वच क्षेत्रांत असून केवळ अध्यात्मातच आहे, असे नाही. इतर क्षेत्रांतही भोंदूगिरी आहे; म्हणून ते संपूर्ण क्षेत्र कलंकित आहे, असे आपण म्हणत नाही. त्याचप्रमाणे संपूर्ण अध्यात्माला कलंकित म्हणणे चुकीचे आहे. त्यामुळे शासनाने सर्वच क्षेत्रांतील भोंदूगिरीच्या विरोधात कारवाई करायला हवी, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. शंभू गवारे यांनी केले. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर २८ ऑगस्टला झालेल्या हिम्मतवालीला सलाम या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी भाजपच्या प्रवक्त्या कांता नलावडे, काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत, अंनिसचे सचिन थिटे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक तुळशीदास भोईटे आदी सहभागी झाले होते. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन वृषाली यादव-सारंग यांनी केले.

श्री. शंभू गवारे पुढे म्हणाले,

१.डेरा सच्चा सौदाचे बाबा राम रहीम यांच्याविषयी न्यायालयाने जो निर्णय दिला, तो स्वागतार्ह आहे. भारतामध्ये अशा प्रकारचे जे भोंदूबाबा आहेत, त्यांना न्यायालयाच्या या निर्णयामुळे चपराकच मिळाली आहे.

२. सनातन संस्थेने गेल्या वर्षांपासून कुंभमेळ्यासह अनेक ठिकाणी भोंदूबाबांच्या विरोधात मोहीम राबवली आहे. त्या अनुषंगाने ग्रंथही प्रकाशित केले आहेत.

३. बाबा राम रहीम प्रकरणातील साध्वींवर जो अन्याय झाला, तो चुकीचा आहे. त्यांना उशिराने मिळालेला न्याय हादेखील राज्यघटनेनुसार अन्यायच आहे. त्यामुळे शासनाने असे खटले जलदगतीने चालवायला हवेत.

भाजप आणि काँग्रेस यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

एकंदरीत चर्चासत्रामध्ये भाजप आणि काँग्रेस यांचे प्रवक्ता हे एकमेकांवर पुढीलप्रकारे कुरघोडीचे राजकारण करत होते.

१. ज्या महिलेने १५ वर्षे लढा दिला, त्यावर शासन तिला काही साहाय्य करणार का ?, हा प्रश्‍न बाजूला ठेवून दोन्ही प्रवक्ते एकमेकांवर आरोप करत होते. सचिन सावंत हे भाजपवर आरोप करतांना म्हणाले, मोदी यांनी धर्माच्या नावावरील हिंसा खपवून घेतली जाणार नाही, असे सांगूनही हरियाणा शासनाने हिंसाचार करणार्‍यांवर कारवाई का केली नाही ?

२. सावंत यांनी भाजपवर आरोप केला की, योगगुरु रामदेवबाबा यांचे भाजपने वर्ष २०१४ च्या निवडणुकीत साहाय्य घेतले. त्यावर कांता नलावडे यांनी काँग्रेसवर आरोप केला की, वर्ष २००७ मध्ये काँग्रेसनेही योगगुरु रामदेवबाबा यांचे साहाय्य घेतले होते. अंनिसवाल्यांचा थयथयाट !

ही चर्चा चालू असतांना सचिन थिटे यांनी सनातनचे २ साधक फरार असून त्याविषयी सनातन का बोलत नाही ?, असा प्रश्‍न केला; परंतु चर्चासत्राची वेळ संपल्याने पुढे त्यावर चर्चा झाली नाही. (स्वतःचे ठेवावे झाकून आणि इतरांचे पहावे वाकून या वृत्तीचे अंनिसवाले ! अंनिसवाल्यांनी दाभोलकर कुटुंबियांनी केलेल्या भ्रष्टाचाराविषयी, तसेच अंनिसचे नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधांविषयी बोलावे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF