मुंबई पोलिसांकडून श्री गणेशाचे मानवीकरण करून विडंबन

प्रबोधन करण्यासाठी इतर धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा असा वापर करण्याचे धारिष्ट्य मुंबई पोलीस करतील का ?

देवतेचे मानवीकरण करणे, हे तिचे विडंबनच होय. गणेशोत्सवाच्या काळात पोलीस, वाहतूक पोलीस नागरिकांना सूचना देण्यासाठी श्री गणेशाच्या प्रतिकाचा वापर करतात, ते सर्वथा अयोग्य आहे. देवाची उपासना करून त्याची कृपा संपादन करायची असते. अशा चित्रांतून देवाची थट्टा होण्याचीच शक्यता अधिक असते. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊन देवाची अवकृपाच होते.

मुंबई – पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भात सूचना देण्यासाठी केलेल्या ट्वीटमध्ये गणपतीची  दोन चित्रे दाखवली आहेत. पहिल्या चित्रात साधा गणपति आहे आणि दुसर्‍या चित्रात त्याच गणपतीने दोन्ही हात कानांवर ठेवले आहेत. या संदर्भात ट्वीट केले आहे, गोंधळाचा आवाज कुणाच्याही कानांना आनंद देऊ शकत नाही. जर एखादा ऐकतच नसेल, तर तुमच्या प्रार्थना करण्याला काय अर्थ रहाणार ? (ध्वनीप्रदूषणाच्या गोंधळामुळे गणपतीने कानावर हात ठेवले आहेत, तर तो तुमची प्रार्थना कशी ऐकणार ? असे त्यांना या चित्रातून सुचवायचे आहे.) तसेच या चित्रांवर लहान अक्षरात इंग्रजीत म्हटले आहे, तुम्हाला कृपाशीर्वाद संपादन करायचा आहे कि त्याला त्रास झालेला पहायचा आहे ?


Multi Language |Offline reading | PDF