गिरिडीह (झारखंड) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर मशिदींमधून दगडफेक आणि गोळीबार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धेच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेणार नाही, असे म्हटले होते; मात्र हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदीमधून होणार्‍या आक्रमणांच्या घटनांच्या विरोधात कोणीही बोलत नाही कि त्यांच्यावर कारवाई होतांना दिसत नाही. उलट हिंदूंनाच आतंकवादी ठरवले जाते ! गोरक्षकांना समाजकंटक ठरवले जाते !

गिरिडीह (झारखंड) – येथील पचंबा भागामध्ये २६ ऑगस्टच्या रात्री धर्मांधांच्या जमावाने श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक केली आणि गोळीबार केला. यात २ जण घायाळ झाले. विसर्जन मिरवणूक वाद्यांसह येथील मशिदीजवळ आली असता मशिदीमधून दगडफेक आणि गोळीबार करण्यात आला होता. यानंतर येथे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी मशिदीत मोठ्या प्रमाणात जमलेल्या लोकांना बाहेर हाकलून लावले. (मशिदीत मोठ्या संख्येने लोक जमलेले होते याचाच अर्थ या आक्रमणाचा कट आधीच रचण्यात आला होता, हे उघड होते ! सनातनच्या आश्रमाची अनेकदा चौकशी करणारे पोलीस कधी मशिदींची चौकशी करतात का ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF