आनंदी जीवनासाठी दोष आणि अहं निर्मूलन करणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

जळगाव येथे भावपूर्ण वातावरणात वाचक मेळावा साजरा

वाचकांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव

जळगाव, ३० ऑगस्ट (वार्ता.) – मानवजन्माचे ध्येय आनंदप्राप्ती करणे आहे; पण सुख आणि दु:ख यांच्या पलीकडचा आनंद कसा मिळवायचा, हे ठाऊक नसल्याने जीवनाची दिशा भरकटत जाते. आपल्यातील स्वभावदोष जाणून घेऊन ते दूर करण्यासाठी सारणी लिखाण करणे, स्वयंसूचना देणे, गुणसंवर्धनासाठी प्रयत्न करून स्वतःमध्ये पालट करण्यासाठीचे प्रयत्न प्रामाणिकपणे करणे, असे केल्यासच जीवन आनंददायी होते. यासोबतच नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता यांची जोड दिल्यास आध्यात्मिक प्रगतीही जलद होते, असे जळगाव येथे २७ ऑगस्टला वाचकांना मार्गदर्शन करतांना सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी सांगितले. या वेळी त्यांनी साधनेची तत्त्वे आणि सिद्धांत यांचे विश्‍लेषण केले. मार्गदर्शनानंतर काही वाचकांनी साधनेविषयी शंकानिरसनही करून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. भावना पाटील यांनी केले.

या वेळी शहरातील २२ वाचक उपस्थित होते. यानंतर वाचकांना जळगाव येथील सेवाकेंद्र दाखवण्यात आले.

क्षणचित्र

या वेळी काही वाचकांनी आम्ही दैनिक सनातन प्रभातची वाचकसंख्या वाढण्यासाठी प्रयत्न करणार, विविध उपक्रमांत सहभागी होऊन सेवा करणार, तसेच रविवारच्या भावसत्संगाला नियमित उपस्थित रहाणार, असे सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF