गणेशोत्सवात वर्गणी गोळा करण्यासाठीच्या पूर्वानुुमतीची पुणे शहरातून केवळ ५५ आवेदने

मंडळांनी प्रशासनाच्या आवाहनाची ऐशी-तैशी करून जुमानत नसल्याचेच दाखवून दिले आहे. प्रशासनाने हेच आवाहन अल्पसंख्यांकांनाही लागू करावे.

धर्मादाय आयुक्तालयाच्या आवाहनाला गणेशोत्सव मंडळांकडून केराची टोपली

पुणे – सर्व गणेशोत्सव मंडळे आणि विश्‍वस्त संस्था यांना चालू वर्षांपासून उत्सवासाठी देणग्या आणि वर्गणी गोळा करण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाची ‘ऑनलाइन’ वा ‘ऑफलाइन’ लेखी पूर्वानुुमती घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतांनाही शहरातील ४ सहस्र ४९९ मंडळांपैकी केवळ ५५ मंडळे आणि संस्था यांची लेखी आवेदने आली आहेत. त्यामुळे उर्वरित गणेशोत्सव मंडळांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा आदेश धाब्यावर बसवला आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

शहर आणि जिल्ह्यात मिळून सुमारे दहा हजारांपेक्षा अधिक नोंदणीकृत मंडळे आणि विश्‍वस्त संस्था आहेत. राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन पारदर्शकता आणण्याचे आवाहन केले होते; परंतु आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नसल्याचेच दिसते. २८ ऑगस्टपर्यंत ४५ आवेदने ‘ऑनलाइन’, तर १० ‘ऑफलाइन’ पद्धतीने आले आहेत. अनुमती न घेणार्‍या मंडळांवर प्रशासन काय कारवाई करणार, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF