देवाला आवडेल अशी सेवा करण्यासाठी तळमळणारा सांगली येथील महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. वेदांत पुरुषोत्तम रेपाळ (वय १० वर्षे) !

भाद्रपद शुक्ल पक्ष अष्टमी (२९.८.२०१७) या दिवशी सांगली येथील कु. वेदांत पुरुषोत्तम रेपाळ याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याने ‘देवाला आवडेल अशी सेवा कशी करावी ?’, याविषयी केलेले चिंतन पुढे दिले आहे.

कु. वेदांत रेपाळ

कु. वेदांत पुरुषोत्तम रेपाळ याला सनातन परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !

‘आपण सर्वांनी देवाला आवडेल अशी सेवा केली पाहिजे. ‘श्रीकृष्ण किंवा परात्पर गुरु डॉ. आठवले एका आसंदीवर बसून ‘आपण सेवा कशी करत आहोत ?’, हे पहात आहेत’, असा आपण सर्वांनी भाव ठेवला पाहिजे. जर ती सेवा आपल्याकडून चांगली झाली नसेल, तर देव कुणाच्या तरी माध्यमातून आपल्याला तसे सांगतो. ती सेवा आपण देवाला आवडेल अशी होण्याकडे कधी लक्ष देतो आणि कधी देत नाही. असे माझ्याविषयीही घडलेले आहे. मी चुका केल्यावर प्रायश्‍चित्त केवळ लिहितोे; पण ते कधीही घेतले नाही.

‘देवा, माझ्याकडून ज्या ज्या चुका होतात, त्या ‘माझ्याकडून त्या परत होऊ नयेत’, यासाठी मी प्रयत्न करतो आणि तूही तसे प्रयत्न माझ्याकडून करवून घे.’ – कु. वेदांत पुरुषोत्तम रेपाळ (वय १० वर्षे), सांगली (१६.८.२०१७)

कु. वेदांतने काढलेले चित्र त्यामध्ये लिहलेली प्रार्थना !

हिंदु राष्ट्र आणू आम्ही ।

हिंदु राष्ट्र आणू आम्ही । दुष्ट प्रवृत्तींना नष्ट करू आम्ही ॥ १ ॥

रामराज्य आणू आम्ही । हिंदु राष्ट्रासाठी लढू आम्ही ॥ २ ॥

चि. वेदांत पुरुषोत्तम रेपाळ (वय १० वर्षे), सांगली (१४.८.२०१७)

 


Multi Language |Offline reading | PDF