अमृतवाणी भाग – ४ या ग्रंथातील निवडक लिखाण

२४ ऑगस्ट या दिवशी पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांनी लिहिलेल्या अमृतवाणी भाग – ४ मधील करणीचा प्रयोग झाल्यावर गुरुजींनी कसे रक्षण केले, ते पाहिले आज त्यापुढील भाग पाहूया.

पू. (सौ.) मंगला उपाध्ये

१ उ. मुलाला करणीमुळे आलेला ताप गुरुजींनी सांगितलेले उपाय केल्यावर उतरणे : अमित लहान होता. त्या वेळी त्याला १०२-१०३ डिग्री फॅ. ताप आला होता. आमचे पूज्य गुरुजी आमच्या समवेत असल्याने आम्हाला कशाचीच भीती वाटत नाही. गुरुजींच्या आज्ञेनुसार राजाभाऊंनी आंघोळ केली आणि ते ध्यानाला बसले. ध्यानामध्ये गुरुजींनी त्यांना अमितवर करणी केल्याचे दाखवले. मग त्यांनी सांगितले, उशीच्या खाली लिंबाला टाचण्या आहेत. त्या लिंबाला परत उलट्या टाचण्या लावून फेकून द्या, म्हणजे ज्यांनी करणी केली असेल, त्याच्याकडेच ती परत जाईल.
गुरुजींच्या सांगण्यानुसार खरोखरच टाचण्या लावलेले लिंबू अमितच्या उशाखालीच सापडले. तेव्हा गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे त्या लिंबाला उलट्या टाचण्या लावून ते फेकून दिले. लिंबू बाहेर फेकून दिल्यानंतर अमितचा ज्वर हळूहळू उतरत गेला आणि तो पूर्णपणे रोगमुक्त झाला. (पृष्ठ ६४)

२. अतृप्त आत्मा घरात घुसण्याचा प्रयत्न करत असतांना देवीने त्या आत्म्याचे पारिपत्य करणे

एकदा गुरुजींनी सांगितले, तुमच्या घरी एक वाईट अतृप्त आत्मा घरात घुसण्याचा प्रयत्न करील. तो दरवाजा वाजवील; परंतु कितीही आवाज आला, तरी दार उघडायचे नाही. बाहेर देवी स्वतःच येऊन त्याचे पारिपत्य करील. तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही.
खरोखरच त्या रात्री साधारण दोन वाजता दार ठोठावल्याचा आवाज ऐकू आला; परंतु गुरुजींनी दिलेल्या कल्पनेमुळे आम्ही घाबरलो नाही. आमच्या लक्षात आले, बाहेर अतृप्त आत्मा आल्याने गुरुजींच्या आज्ञेनुसार दार उघडायचे नाही. गुरुजींवर दृढ विश्‍वास असल्याने आम्ही दार न उघडता तसेच झोपी गेलो. (पृष्ठ ५९)

३. गुरुजींनी मुलीला मांत्रिकाच्या कारस्थानापासून वाचवणे

आमच्या मुलीच्या कार्यालयातील कारकून तिच्या पाठीमागे लागला होता. तिलाही त्याची कल्पना नव्हती. एकदा गुरुजींनी सांगितले, तिच्या मागे कारकून लागला आहे. तो काल सांताक्रूझला आण्णा केरकट्टा नावाच्या मांत्रिकाकडे गेला. त्याने त्या मांत्रिकाला १०० रुपये देऊन त्याच्याकडून एक पुडी मंत्रवून घेतली आहे. तो माणूस ती पुडी हिच्या पटलाखाली ठेवणार आहे. त्या पुडीला हिचा स्पर्श झाल्यानंतर ही वेडीपिशी होईल. त्यामुळे दुसर्‍या दिवशी ती पुडी बाजूला करण्यासाठी गुरुजी (सूक्ष्मातून) तेथे उपस्थित राहिले. त्या माणसाने आमच्या मुलीच्या पटलाखाली ठेवलेली पुडी गुरुजींनी उचलून त्याच्या लखोट्यात ठेवली. त्या माणसाला तेथे पुडी ठेवल्याचा आनंद झाला होता; परंतु थोड्या वेळाने तो आमच्या मुलीच्या पटलापाशी जाऊन पुडी असल्याची निश्‍चिती करून घेऊ लागला. त्या वेळी पुडी पटलाखाली नाही, असे त्याच्या लक्षात आले. नंतर त्याने आपण विसरल्याचे समजून स्वतःच्या पाकिटात बघितले, तर पुडी त्याच्याच पाकिटात होती. मग त्याने वेळ साधून पुडी पुन्हा पटलाखाली ठेवली. त्याने पुडी ठेवल्यानंतर गुरुजी ती पुडी पुन्हा उचलून त्याच्या पाकिटात ठेवत होते. मग शेवटी कंटाळून त्याने नादच सोडून दिला. (पृष्ठ ६१)

– पू. (सौ.) मंगला न. उपाध्ये, पुणे (आनंदयात्रा, अमृतवाणी भाग ४)

 

शिष्यामधील अभद्राचे विसर्जन करून त्याची देहशुद्धी आणि चित्तशुद्धी झाल्यावर त्याला आनंदस्थितीचा अनुभव देणारेे गुरु !

गुरु या शब्दाची फोड (गु आणि रु) गु म्हणजे गुवति आणि रु म्हणजे परब्रह्म, अशी आहे. गुवति म्हणजे सर्व अभद्र दुष्ट विकारवशतेतून येणार्‍या नीच दु:खी स्थितीचे विसर्जन करणे. निर्मल वृत्ती आणि प्रेमशक्ती यांनी केलेले दु:खाचे विसर्जन म्हणजे निर्माल्य. सद्गुरूंनी अभद्राचे विसर्जन केल्यावर रु म्हणजे शेष रहाणारा आणि आनंदस्थितीविषयी अतिक्रिया देणारा आनंदध्वनी (रुदन) होय. देहशुद्धी आणि चित्तशुद्धी झाल्यावर आनंदस्थितीत सुखावस्थेतही आनंदाश्रू हृदय हेलावल्यामुळे निर्माण होतात. हे रुदन म्हणजे आनंदाचा हुंकार होय.

– गुरुकृपांकित डॉ. माधवराव दीक्षित (आनंदयात्रा, अमृतवाणी भाग ४, पृष्ठ १४)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF