गेल्या ७ वर्षांहून अधिक काळ केवळ शाडूमातीच्या श्री गणेशमूर्ती बनवणारे श्री. राजेंद्र कुंभार !

श्री. राजेंद्र कुंभार

भेंडवडे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) – येथील मूर्तीकार श्री. राजेंद्र कुंभार (वय ४२ वर्षे) हे गेल्या ७ वर्षांहून अधिक काळ केवळ शाडूमातीच्या श्री गणेशमूर्ती सिद्ध करत आहेत. या मूर्तींमध्ये प्रामुख्याने सनातन संस्थेच्या श्री गणेशाच्या सात्त्विक मूर्तीप्रमाणे ते मूर्ती सिद्ध करतात. याविषयी श्री. राजेंद्र कुंभार म्हणाले, “मी मूर्ती करतांना स्नान करून आरती करून शुचिर्भूत होऊनच मग मूर्ती करतो. सनातनच्या मूर्तीप्रमाणे मूर्ती सिद्ध करतांना मन शांत होते. या मूर्ती सिद्ध करण्यास प्रारंभ केल्यापासून घरातील वातावरण पालटले आहे. घरी शांत वाटते. मुलांमध्येही सकारात्मकता वाढली आहे. ही मूर्ती करतांना मला एक वेगळाच आनंद जाणवतो.”

श्री. राजेंद्र कुंभार यांच्याकडील मूर्ती वितरण करणारे मिरज येथील श्री. नितीन कुलकर्णी म्हणाले की, अनेकांनी या मूर्ती घरी नेल्यावर श्री गणेशाचा नामजप होणे, घरी चांगले वाटणे, प्रसन्न वाटणे अशा प्रकारच्या अनुभूती येत असल्याचे सांगितले आहे.

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथे शाडूच्या मूर्ती करणारे मूर्तीकार जयंत आठवले !

याचप्रकारे ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथील मूर्तीकार श्री. जयंत आठवले हे शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवत आहेत. या मूर्तीही अध्यात्मशास्त्रानुसार सिद्ध केलेल्या आहेत.


Multi Language |Offline reading | PDF