मानवतावादी संघटनांचे खरे स्वरूप !

भारतातील निधर्मी आणि साम्यवादी हे देशात कथित असहिष्णुता वाढीस लागल्याबद्दल ओरड करत असतात. या सूत्राला धरून अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल या जागतिक मानवाधिकार संघटनेनेही भारतावर कोरडे ओढले आहेत. या संघटनेच्या म्हणण्यानुसार भारतातील विद्यमान सरकार धार्मिक अहिंसा रोखण्यास पूर्णपणे अपयशी ठरले असून ते असमर्थ आहे; इतकेच नव्हे, तर अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या २०१५-१६ या वार्षिक अहवालानुसार भारतात असहिष्णुता वाढत असल्याच्या निषेधार्थ वैज्ञानिक, कलाकार आणि लेखक यांनी त्यांचे विविध पुरस्कार परत केले आहेत.

खरे म्हणजे भारतातील मानवाधिकार संघटना या प्रत्यक्षात मानवतावादी नसून हिंदुद्वेषी आणि मुसलमानधार्जिण्या आहेत अन् त्यामुळे साहजिकच त्या देशद्रोही आहेत.  तसेच अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल ही संस्था अमेरिका आणि इंग्लंड येथील ख्रिस्ती लोकांच्या भरवशावर चालू असून हिंदुस्तानला स्थिर होण्यापासून खाली खेचणे, हेच यांचे लक्ष्य आहे. मोदी सरकारने यांच्या पिलावळीवर बंदी आणली आणि या सापास ठेचले म्हणून हे चेकाळले आहेत. आतंकवाद्यांना माफी द्या, बलात्कार्‍यांना अल्प शिक्षा द्या, अल्पसंख्यांकांना प्रथम अधिकार द्या, अशा अत्यंत देशद्रोही मागण्या या संघटना करत असतात. यावरून  मानवाधिकार संघटना भारतातील आहेत कि पाकमधील असा प्रश्‍न पडतो.

बहुसंख्यांक हिंदू देशातील अल्पसंख्यांकांना नेहमीच दाबतात, दंगल घडवून मारतात, असे भारताविषयीचे अत्यंत चुकीचे अन् उलटे चित्र जगात दाखवण्याचे हे सगळे काम अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलकडून पडद्याआड चालू असते. परदेशी पैशांवर समाजसुधारणेच्या नावाखाली देश फोडण्याचे आणि खिळखिळा करण्याचे उघड कारनामे यांच्यावर जमा आहेत. अशा मानवाधिकार संघटनांवर केवळ बंदी नव्हे, तर त्यांच्यावर देशद्रोहाचे खटले भरवून त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई व्हायला हवी.

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने भारतावर असहिष्णुतेविषयी केलेली टीका सत्य नसून पक्षपाती आहे. खरे तर चीनने मानवी हक्क पूर्णपणे डावललेले आहेत. तरीदेखील ही संस्था चीनविषयी मात्र गप्प असते. चीनसोबत मस्ती केली, तर आपले अस्तित्वच रहाणार नाही, हे या देशद्रोही संघटनांना ठाऊक आहे. भारतात मात्र यांना ७० वर्षे मोकळे रान होते. चीन बलवान, तर भारत आपल्या करंटेपणामुळे बलहीन होता; मात्र आता हे चित्र पूर्णपणे पालटायला हवे. सरकारने आणि जनतेने अशा संघटनांविषयी मात्र पूर्णपणे आणि खर्‍या अर्थाने असहिष्णू व्हायला हवे, तरच देशाचा खरा विकास होईल.

– श्री. निलेश देशमुख, सानपाडा, नवी मुंबई.


Multi Language |Offline reading | PDF