कार्ला (जिल्हा पुणे) येथील श्री एकवीरादेवीच्या गडाच्या पायर्‍या कोसळल्या !

भारतीय पुरातत्त्व विभागाचे डागडुजीकडे दुर्लक्ष

हीच घटना एखाद्या अल्पसंख्यांकांच्या प्रार्थनास्थळाविषयी घडली असती, तर पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केले असते का ?

पुणे – श्री एकवीरादेवीच्या गडाच्या पायर्‍या सतत पडणार्‍या पावसाच्या पाण्यामुळे कोसळल्या आहेत, तसेच पायर्‍यांचा भराव खचल्याने भाविकांना चालणे अवघड झाले आहे. गेल्या ३ वर्षांपासून गडाच्या पायर्‍यांवर अनेक वेळा दरड कोसळली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने गडाच्या पायर्‍या आणि सुरक्षा भिंती यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे.

पाच पायरी मंदिराच्या खालील बाजूला पायरीचा केवळ एक दगड शिल्लक राहिला असून भराव खचल्याने रस्त्यात मोठा खड्डा पडला आहे. लेणीच्या पायर्‍याही मागील १० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून तुटल्याने बंद केल्या आहेत. गडावरील अनेक पुरातन वास्तू नामशेष होऊ लागल्या आहेत. वेहेरगावातील सामाजिक कार्यकर्ते आणि मनविसेचे अशोक कुटे यांनी गडाच्या पायर्‍यांची छायाचित्रे आणि त्याविषयीचे निवेदन पुणे जिल्हाधिकार्‍यांना, तर श्री एकवीरा देवस्थानचे अध्यक्ष अनंत तरे यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांना दिले आहे.


Multi Language |Offline reading | PDF