प्रस्तावित लोहखनिज पट्टा आणि खाणकाम यांना असनिये ग्रामस्थांचा विरोध

सावंतवाडी – महाराष्ट्र शासनाच्या खनिकर्म संचनालयाने तालुक्यातील असनिये गावात संमत केलेला लोहखनिजपट्टा आणि खाणकाम याला विरोध केला आहे. १५ ऑगस्ट या दिवशी झालेल्या ग्रामसभेच्या वेळी याविषयी ठराव संमत करण्यात आला. या वेळी सरपंच गजानन सावंत, ग्रामसेवक मुकुंद परब, ग्रामपंचायत सदस्या प्रियांका सावंत, कविता जाधव, विभा कोळापटे, तसेच तलाठी परब उपस्थित होते.

असनिये गावाचा समावेश ‘इको सेन्सिटिव्ह झोन’मध्ये (पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात) करण्यात आला असून गावात पर्यावरण संवर्धनाचे अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. तरीही शासनाने लोहखनिज पट्ट्याला संमती दिली आहे. यापूर्वीही ग्रामस्थांनी गावातील खाणकामाला विरोध केला होता.


Multi Language |Offline reading | PDF