(म्हणे) ‘इतिहासातून मोगलांचे धडे वगळणे, हे सांस्कृतिक पाप !’

डॉ. श्रीपाल सबनीस यांची निधर्मी पोपटपंची

पुणे – इतिहासातून मोगलांचे धडे वजा केले जात आहेत. शासकीय विद्वानांच्या कृपाशीर्वादाने हे सांस्कृतिक पाप घडत आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. (‘एनसीईआरटीई’  अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा ५ ओळींचाच इतिहास लिहिला आहे. त्याविषयी सबनीस साधा ‘ब्र’ही का काढत नाहीत ? हिंदू संघटित नसल्यामुळेच हिंदूंवर अन्याय होणे, हे सबनीसांसारख्यांना पाप वाटत नाही ! – संपादक) साहित्य शिवार वार्षिक यांच्या वतीने माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ५ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित ‘आठवणींचा जागर’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की,

१. जगप्रसिद्ध ताजमहाल हा आता ‘तेजोमहाल’ असल्याचे सांगून उलट्या दिशेने सांस्कृतिक प्रवाह निर्माण केला जात आहे. (हा उलटा प्रवास नसून जे खरे आहे, तेच तेजोमहालाविषयी मांडले जात आहे. पु.ना. ओक यांचे संशोधन न वाचणार्‍यांना साहित्यिक तरी कसे म्हणावे ? – संपादक)

२. गोरक्षकांच्या अंदाधुंदीतून लोकशाही आणि अल्पसंख्याक यांना धोके निर्माण होत आहेत. (धर्मांधांनी कोट्यवधी गायींची हत्या करून गोवंश संपुष्टात आणणे आणि लक्षावधी हिंदूंना काश्मीर सोडायला लावून परागंदा करणे, त्याविषयी सबनीस का बोलत नाहीत ? – संपादक)

३. दोन्ही काँग्रेस भ्रष्टाचाराच्या पापामध्ये बुडाल्याने समाजाला नको असलेले भाजपाचे राज्य आले. (काँग्रेसवाल्यांना चपराक ! – संपादक) त्यामुळे कधी झाला नाही, तेवढा गांधी आणि नेहरु यांचा द्वेष होत आहे. हे विद्वेषाचे राजकारण देशाला आणि महाराष्ट्राला परवडणारे नाही. (नेहरूंचे सत्य तर आता इंग्लडचे लोकही सांगत आहेत. सत्यात समोर येण्याची शक्ती असतेच. त्यामुळे सबनीस करत असलेला अभ्यासहीन हिंदुद्वेष हिंदूंना परवडणारा नाही, हेही त्यांनी लक्षात घ्यावे ! – संपादक) काँग्रेसमुक्त आणि भाजपमुक्त भारत या दोन्ही पक्षांच्या घोषणा लोकशाहीला मारक आहेत. यामुळे देशाची राजकीय व्यवस्था आणि संस्कृती अधोगतीला जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF