कसबा सांगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा ग्रामसभेत ठराव मान्य !

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून दुकानदारांना निवेदन

चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी दुकानदार श्री. दीपक गंगाई (उजवीकडे)यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कसबा सांगाव, १७ ऑगस्ट (वार्ता.) – कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने गावातील १५ दुकानदारांना चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी १५ ऑगस्टला निवेदन देण्यात आले. या वेळी दुकानदारांनी चिनी वस्तू दुकानात न ठेवण्याचे आश्‍वासन दिले. तेथे आयोजित केलेल्या ग्रामसभेत चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. विजय आरेकर यांनी मांडलेला ठराव एकमताने मान्य करण्यात आला. (राष्ट्रप्रेमी भूमिका घेणार्‍या श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि ग्रामस्थ यांचे अभिनंदन ! – संपादक)

उपस्थित मान्यवर

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री विजय आरेकर, दिलीप कोरे, प्रल्हाद माळी, माजी सैनिक सर्वश्री रमेश माळी, बबन माने, भरत आवळे, बजरंग दलाचे सर्वश्री प्रवीण माळी, विनायक आवळे, शिवसेनेचे सर्वश्री नितीन सुतार, सतीश कोळी, भाजपचे श्री. दीपक भानुसे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे

निवेदनात म्हटले आहे की,

१. सध्या भारत आणि चीन यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने त्यांच्यामध्ये कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकते. चीनच्या साम्राजवादी भूमिकेविरुद्ध पेटून उठणे हे प्रत्येक भारतियांचे कर्तव्य आहे.

२. जागतिक खुल्या अर्थव्यवस्थेच्या परिणामामुळे चीनने बहुतांश भारतीय बाजारपेठ गिळून टाकली आहे. भारतातील सहस्रो कोटी रुपयांच्या व्यापारामुळे चीन आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला आहे.

३. भारतीय नागरिकांनी चीनच्या साम्राजवादी भूमिकेला विरोध करण्यासाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार घातल्यास चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसू शकतो. यासाठी चिनी वस्तू न वापरणे, चिनी साहित्य उपलब्ध न करणे, हे प्रत्येक भारतियांचे कर्तव्य आहे. यासाठी आपण आपल्या दुकानांमध्ये चिनी वस्तू विक्रीसाठी ठेवू नयेत.


Multi Language |Offline reading | PDF