(म्हणे) ‘कडवा राष्ट्रवाद जोपासण्याच्या नावाखाली उन्माद वाढत आहे !’ – प्रा. भालचंद्र नेमाडे यांचा कांगावा

हिंदूंना लक्ष्य करणारी कडवी धर्मांधता वारंवार देशभर प्रगट होत असते, तेव्हा नेमाडे कधी काही विधाने करत नाहीत. काश्मीर, बंगाल, केरळ यांसह अनेक राज्यांत धर्मांध हिंदूंवर आक्रमणे करतात, तेव्हा प्रा. नेमाडे यांना हा धर्मांधांचा उन्माद वाटत नाही. अशा बुद्धीवादी प्राध्यापकांमुळेच विद्यार्थी आणि समाज यांची दिशाभूल होत आहे !

मुंबई – देशात विविध धर्म, जाती, पंथ एकत्र रहात असून विविध संस्कृती जोपासल्या जात आहेत. हेच खरे राष्ट्रभक्तीचे मूळ आहे. (भारतात विविधता आहे, हा पाश्‍चात्त्यांनी फूट पाडण्यासाठी पसरवलेला विचार आहे. संपूर्ण भारतात सर्व ठिकाणी हिंदु धर्मातील अंतर्गत धाग्यांनी एकसंधता घट्ट गुंफलेली आहे. ही एकसंधताच राष्ट्रअस्मिता जागृत करणारी आहे ! – संपादक) देशात वाढत्या हत्या, बलात्कार आदी घटनांचा विचार करण्याची वेळ आली आहे. सध्या कडवा राष्ट्रवाद जोपासण्याच्या नावाखाली उन्माद वाढत आहे, असे मत प्रा. भालचंद्र नेमाडे यांनी नुकत्याच राष्ट्र सेवादलाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्च्यानंतर येथील क्रांती मैदानावर झालेल्या सभेत व्यक्त केले. (सध्या ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास नकार देणारे, पाकचा ध्वज फडकावून विजयोत्सव साजरा करणारे पाकप्रेमी यांनी थैमान घातले आहे. या वस्तूस्थितीविषयी न बोलणारे हिंदुद्वेषी नेमाडे यांच्या देशप्रेमावरच प्रश्‍नचिन्ह उभे रहाते ! – संपादक)

नेमाडे पुढे म्हणाले, “छोडो भारत आंदोलनाला विरोध करणार्‍यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात काडीचेही योगदान नव्हते, असे लोक आज सत्तेवर आहेत. (क्रांतीकारकांच्या बलीदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याचा पुरस्कार करणारे आज सत्तेवर आहेत ! – संपादक) देशात बाहेरच्या शक्तींमुळे अस्थिरता निर्माण होत नाही, तर घरभेदींमुळेच होते. हे घरभेदी ओळखले पाहिजेत.” (भारतात राहून शत्रूराष्ट्र पाकचे गोडवे गाणारे, इसिसमध्ये सहभागी होणारे, आयएस्आयशी संलग्न असलेले धर्मांध, काश्मीरमध्ये सैन्यावर दगडफेक करणारे फुटीरतावादी हे घरभेदी असून यांचा निषेध नेमाडे कधी का करत नाहीत ? – संपादक)

स्वातंत्र्यवीर सावरकर, हेडगेवार आणि पू. गोळवलकरगुरुजी यांना ‘गद्दार’ ठरवणारे हिंदुद्वेषी प्रा. भालचंद्र नेमाडे !

प्रा. नेमाडे यांच्या टीकेला रा.स्व. संघाने उत्तर द्यावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

या वेळी वाटण्यात आलेल्या पत्रकातून खोटा इतिहास पसरवला जात होता. पत्रकात म्हटले आहे की, ‘चले जाव’ चळवळीला हिंदु महासभा, मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी संघटनांनी विरोध करून भारतीय जनतेचा विश्‍वासघात केला होता. बॅ. जीना, बॅ. सावरकर, श्याम प्रसाद मुखर्जी, हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी या नेत्यांनी ब्रिटीशधार्जिणी भूमिका घेऊन देशबांधवांशी गद्दारी केली होती, हा खरा इतिहास आहे. (स्वातंत्र्यवीर सावरकर, हेडगेवार, पू. गोळवलकरगुरुजी यांच्यासारख्या देशप्रेमींनी देशासाठी केलेल्या त्याग कोणताही देशप्रेमी विसरणार नाही ! अशांना हिंदुद्वेषातून गद्दार ठरवणे, ही बौद्धिक दिवाळखोरीच होय !  – संपादक) शेतकरी, मजूर, दलित, अल्पसंख्यांक, कष्टकरी यांच्यासाठी भांडणार्‍यांना देशद्रोही ठरवले जात आहे. जे इंग्रजांचे हस्तक होते ते देशप्रेमी बनून राजपटावर विराजमान आहेत. आज मनुवादी विचारांचे राज्य स्थिरावू पहात आहे. (मनु हा ब्राह्मण नसून क्षत्रियच होता. सहस्रो वर्षांपूर्वीचे त्याचे विचार काळाच्या ओघात आजही टिकून आहेत, याचाच अर्थ ते अनुकरणीय आहेत ! मनुस्मृतीचा कोणताही अभ्यास न करता त्यावर नाहक टिका करून जातीयवादाला खतपाणी घालणे कितपत योग्य ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF