पुणे महानगरपालिकेमध्ये लोकमान्य टिळक यांचे तैलचित्र बसवण्याचा प्रस्ताव पक्षनेत्यांच्या बैठकीत संमत

स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७१ वर्षांत लोकमान्य टिळक यांचे तैलचित्र न बसवले न जाणे म्हणजे त्यांची केलेली उपेक्षा नव्हे का ?

पुणे – महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये लोकमान्य टिळक यांचे तैलचित्र बसवण्याच्या प्रस्तावाला १४ ऑगस्टला झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत संमती देण्यात आली. सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२५ वे वर्ष कि १२६ वे यावरून सध्या वाद चालू आहे. या पार्श्‍वभूमीवर पालिकेतील वरील निर्णयाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकमान्य टिळक यांचे तैलचित्र बसवण्याचा प्रस्ताव सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी ठेवला होत. त्याला एकमताने संमती देण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF