उत्तरप्रदेशमध्ये राष्ट्रगीत न गाणार्‍या मदरशांच्या संबंधितांवर रा.सु.का. अंतर्गत कारवाई होणार !

अशांना कारागृहात ठेवून पोसण्यापेक्षा देशातून हाकलून लावा !

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेश शासनाने आदेश देऊनही १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी मदरशांमध्ये ध्वजवंदन आणि राष्ट्रगीत न गाण्याच्या प्रकरणी सरकार राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या सिद्धतेत आहे. या कायद्यानुसार शासन अटकेतील व्यक्तीला हवे तेवढे दिवस कारागृहात ठेवू शकतेे आणि त्याचे कारण सांगणेही सरकारला बंधनकारक नाही.

बरेलीचे पोलीस आयुक्त म्हणाले की, ज्या मदरशांत राष्ट्रगीत गायले गेले नाही, त्याचे पुरावे मिळाले असून संबंधितांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल.


Multi Language |Offline reading | PDF