प्रतिदिन एखाद्या गरीब रुग्णाचा विनामूल्य उपचार करावा ! – डॉ. प्रवीण तोगाडिया

 वाराणसी – गरिबांना आरोग्य सुविधा मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रतिदिन एका तरी गरीब रुग्णावर डॉक्टरांनी मोफत उपचार करावे, असे आवाहन विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी येथील ‘इंडिया हेल्थ लाइन’ कार्यक्रमात डॉक्टरांना संबोधित करतांना केले. ‘इंडिया हेल्थ लाइन’ ही परिषदेशी संलग्नित संस्था आहे. या वेळी डॉ. तोगाडिया म्हणाले, ‘‘देशातील २९ टक्के जनतेपर्यंतच सरकारी आरोग्य सेवा पोहोचते. ‘इंडिया हेल्थ लाइन’कडून प्रतिदिन किमान एक रुग्ण डॉक्टरांकडे पाठवण्यात येणार आहे. रूग्णांच्या योग्य इलाजासाठी हेल्थ लाईनच्या माध्यमांतून सेवा देण्यात येणार आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF