कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर तुघलकी निर्बंध

स्वतःच अस्तित्वहीन होण्यासाठी काँग्रेसने उचललेले पाऊल. श्री गणेश या देवतेचे वक्रतुंड म्हणजे वाममार्गावरून जाणार्‍यांना योग्य मार्ग दाखवणारी देवता, असे एक नाव आहे. या देवतेचा उत्सव भाविकांच्या भावाप्रमाणे साजरा करण्यात अडथळा आणणार्‍या कर्नाटक राज्य शासनाला हीच देवता योग्य-अयोग्यची जाणीव करून देईल.

चित्रदुर्ग (कर्नाटक) – येथील जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर अनेक तुघलकी निर्बंध लावले आहेत. या निर्बंधांच्या माध्यमातून प्रशासन गणेशोत्सवाचे वैभव संपवत असल्याची भावना गणेशभक्तांमध्ये निर्माण झाली आहे. या निर्बंधांच्या विरुद्ध न्यायालयात जाण्याची चेतावणी विश्‍व हिंदु परिषदेने दिली आहे. (कर्नाटकचे हिंदुद्वेष्टे काँग्रेसी प्रशासन उद्या गणेशोत्सव साजरा करू नका, असेही, सांगेल ! – संपादक)

बेंगळुरू महानगर गणेशोत्सव समितीचे प्रकाशराजू यांनी सांगितले, प्रशासनाने प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळे निर्बंध लावले आहेत. काही जिल्ह्यांत लोकांना एकत्र येण्यावर मज्जाव करण्यात आला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये मिरवणुकीवरही बंदी घालण्यात येत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवरील काही निर्बंध

१. गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी १० लक्ष रुपयांची अनामत रक्कम जमा करावी

२. निर्धारीत केल्याप्रमाणेच मूर्तींची उंची असावी.

३. ठरवून दिलेल्या ठिकाणी आणि वेळेत विसर्जन करावे.

४. ठरवून दिलेले दिवस प्रतिष्ठापना करावी.

५. प्रार्थनास्थळ असलेल्या मार्गावरून मिरवणूक काढू नये.


Multi Language |Offline reading | PDF