श्रीगोंदा (जिल्हा नगर) येथील जैन मंदिरातील २४ वे तीर्थंकर यांच्या पंचधातूच्या मूर्तीची चोरी

मंदिरांमध्ये वारंवार चोर्‍या होणे, हे सरकारला लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

 

श्रीगोंदा – येथील दिगंबर जैन मंदिरातील २४ वे तीर्थंकर यांची २५० वर्षांपूर्वीची आणि ३ किलो वजन असलेली पंचधातूची मूर्ती १२ ऑगस्टला चोरीला गेली आहे. त्या मूर्तीचे मूल्य अनुमाने २ लक्ष रुपये आहे. सकाळी ९ वाजता दोन स्थानिक रहिवाशांनी मंदिरात पूजा केली, त्या वेळी वरील मूर्ती होती. मंदिरानजीक असलेल्या क्लोज्ड सर्किट टिव्हीमध्ये एका अज्ञात व्यक्तीची प्रतिमा मुद्रित झाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF