(म्हणे) ‘स्वातंत्र्यदिनी मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणणार नाही !’ – मेरठ आणि बरेली येथील काजींची दर्पोक्ती

‘देशातील मुसलमानांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे’, असे म्हणणारे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आता याविषयी बोलतील का ?

राष्ट्रगीत म्हणण्यास नकार देणार्‍यांना या देशात रहाण्याचा कोणताही अधिकार नाही ! अशांनी या देशांत निघून जावे !

. . . मात्र राष्ट्रगीत गायले जाणार नाही

लक्ष्मणपुरी – मदरशांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला जाईल; मात्र राष्ट्रगीत गायले जाणार नाही, अशी देशद्रोही भूमिका उत्तरप्रदेशातील मेरठ आणि बरेली येथील मदरशांतील काजींनी घेतली आहे. हे राष्ट्रगीत किंग जॉर्जच्या स्वागतासाठी रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिले होते. त्यामुळे आमची श्रद्धा अल्लावर असून किंग जॉर्जवर नाही, त्यामुळे ते आम्ही म्हणणार नाही, असे या काजींनी म्हटले आहे.

जमात रजा ए मुस्तफा संस्थेचे प्रवक्ता नासिर कुरेशी यांनी ‘राष्ट्रगीत गाऊ नये’, असा आदेश मदरशांना दिला आहे.

सरकारने म्हटले आहे की, जो कोणी सरकारच्या आदेशाचे पालन करणार नाहीत त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. (सरकारने अशा मदरशांना टाळे ठोकून ते चालवणार्‍यांना देशातून हाकलून दिले पाहिजे ! – संपादक)

उत्तरप्रदेशनंतर आता मध्यप्रदेशमध्येही मदरशांना स्वातंत्र्यदिन साजरा करणे बंधनकारक

असा एकेक राज्यांनी आदेश देण्याऐवजी केंद्र सरकारच असा आदेश का देत नाही ? 

भोपाळ – उत्तरप्रदेशनंतर आता मध्यप्रदेशातील मदरशांनाही स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकावण्याचा आदेश देण्यात आला आहे. मध्यप्रदेश मदरसा बोर्डाने त्यांच्याकडे नोंदणी असलेल्या सर्व ४ सहस्र ७५० मदरशांना स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहरण करण्याचे, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे, तसेच तिरंगा यात्रा आयोजित करण्याचे किंवा त्यात भाग घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या कार्यक्रमाचे छायाचित्र काढून ते इमेल करण्यास सांगण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF