काश्मीरमधील देशद्रोही धर्मांधांनी सैनिकांवर केलेल्या दगडफेकीमुळे आतंकवादी झाकीर मूसा पळाला !

दगडफेक करणार्‍यांचे समर्थन करणारी काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्ष या घटनेविषयी बोलतील का ?

दगडफेक करून आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या देशद्रोह्यांवरही आतंकवाद्यांवर करतात, तशी कारवाई सैन्याने करायला हवी होती, असेच जनतेला वाटते !

श्रीनगर – ११ ऑगस्टच्या संध्याकाळी त्राल येथील नूरपुरामधील स्वतःच्या मूळ घरात लपलेला हिजबूल मुजाहिदीनचा माजी कमांडर झाकीर मूसा याला पकडण्यासाठी सैनिक तेथे पोहोचले होते; मात्र त्याच वेळी देशद्रोही धर्मांधांनी सैनिकांवर दगडफेक करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे झाकीर मूसा याला येथून पलायन करता आल्याची घटना घडली आहे. झाकीर आणि त्याच्या सहकार्‍याने पलायन केल्यानंतर दगडफेक थांबली.  झाकीर मूसा त्याच्या सहकार्‍यासह येथे लपल्याची माहिती सैनिकांना मिळाली होती. मूसा याने हिजबूल मुजाहिदीनमधून बाहेर पडल्यानंतर अल-कायदाच्या साहाय्याने  अंसार गजवा-उल-हिंद नावाची आतंकवादी संघटना उभी केली आहे.

पाकच्या गोळीबारात १ महिला ठार

देशातील नागरिकांना पाकच्या गोळीबारात नाहक प्राण देण्यास भाग पाडणारे शासनकर्ते हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

श्रीनगर – पाकच्या सैन्याने १२ ऑगस्टच्या पहाटे काश्मीरच्या मेंढर सेक्टर येथे केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला. पाकने ग्रेनेडचाही वापर केला. येथील एका घराची हानी झाली. यात असणार्‍या या महिलेचा यामुळे मृत्यू झाला. याव्यतिरिक्त रात्री कुपवाडा जिल्ह्यातील सैनिकी तळावर आतंकवाद्यांनी आक्रमण केले. यात एक सैनिक घायाळ झाला.