चीनच्या सीमेवर भारतीय सैनिकांच्या संख्येत वाढ

नवी देहली – डोकलाम प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम राज्यांतील चीनच्या सीमेवर अधिकचे सैन्य तैनात केले आहे. याला एका वरिष्ठ अधिकार्‍याने दुजोराही दिला आहे. आतापर्यंत भारताने या भागात मोजकेच सैनिक तैनात केले होते; मात्र चीन वारंवार युद्धाची धमकी देत असल्याने भारताने हे सैनिक तैनात केले आहेत. असे असले तरी डोकलाममध्ये अधिक सैनिक तैनात करण्यात आलेले नाहीत.

डोकलाम भूतानचेच !

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी डोकलाम हा आमचाच भाग आहे आणि त्याला भूताननेही मान्यता दिली आहे, असा दावा केला होता. हा दावा भूतानने फेटाळून डोकलाम भूतानचाच भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. भूतानने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, चिनी सैन्याने डोकलाम भागात चालू केलेले रस्त्याचे काम वर्ष १९८८ आणि १९९८ च्या सीमासुरक्षा कराराचे उल्लंघन आहे.