भारत समजूतदार, तर चीन बालिश ! – अमेरिकेचे संरक्षणतज्ञ

वॉशिंग्टन – चीनबरोबर चालू असलेल्या वादामध्ये भारताचे धोरण अगदी योग्य आहे. भारतीय सैन्य वादग्रस्त भागातून माघारी आलेले नाही आणि ते चीनच्या धमक्यांना कोणतेही प्रत्युत्तर देत नाही. भारत एक अनुभवी आणि समजूतदार देशाची भूमिका पार पाडत आहे, तर चीन बालिशपणा करत आहे, असे अमेरिकेतील संरक्षणतज्ञ प्रा. जेम्स आर्. होम्स यांनी म्हटले आहे. होम्स पुढे म्हणाले की, जर चीनला सागरामध्ये त्याची शक्ती वाढवायची असेल, तर त्याला त्याच्या सीमांचे रक्षण करावे लागेल; मात्र याचा असा अर्थ नाही की, त्याने शेजारी देशांच्या सीमांमध्ये घुसखोरी करावी. सध्या भारताला या प्रकरणात अमेरिकेचा हस्तक्षेप नको आहे, असे वाटते; मात्र वाद वाढल्यास अमेरिका भारतालाच साहाय्य करील, असेही होम्स म्हणाले.