गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील रुग्णालयात ऑक्सिजनअभावी आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू

या घटनेला उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई होणार का ?

गोरखपूर – येथील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये उपचार घेतांना ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता ६३ वर पोहोचली आहे. १२ ऑगस्टला सकाळी मेंदूज्वर झालेला आणखी एक ११ वर्षांचा मुलगा मृत्युमुखी पडला. रुग्णालयात मागील एक महिन्यापासून ऑक्सिजन पुरवठ्याची समस्या आहे. ऑक्सिजनचा पुरवठा करणार्‍या पुष्पा सेल्स या आस्थापनाने १ ऑगस्टलाच पत्र लिहून रुग्णालय प्रशासनाला ऑक्सिजनची ६३ लाख ६५ सहस्र रुपये थकबाकी न दिल्यास पुरवठ्यावर परिणाम होईल, अशी चेतावणी दिली होती. प्रशासनाने याची माहिती राज्य सरकारला दिली होती, अशी माहिती पुढे येत आहे. दोनच दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी स्वत: या रुग्णालयाचा दौरा केला होता. या घटनेनंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निलंबित करण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF