ब्रेव्ह न्यू लूक आस्थापनाकडून भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र असणार्‍या लेगिंग्जची ऑनलाईन विक्री बंद

हिंदु जनजागृती समिती आणि राष्ट्रप्रेमी यांच्या विरोधाचा परिणाम !

हे चित्र छापण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नसून त्यांना विडंबन कळण्यासाठी चित्र छापण्यात आले आहे.

कॅलिफोर्निया (अमेरिका) – सॅन फ्रॅन्सिस्को येथील ब्रेव्ह न्यू लूक या आस्थापनाने तिच्या संकेतस्थळावर भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र असलेल्या लेगिंग्ज ऑनलाईन विक्रीसाठी ठेवल्या होत्या. यामुळे भारतियांच्या भावना दुखावल्याने त्यांनी याचा निषेध करण्यास प्रारंभ केला होता. हिंदु जनजागृती समितीनेही याविरोधात ऑनलाईन मोहीम चालू केली होती. याचा परिणाम म्हणजे या आस्थापनाने या लेगिंग्जची विक्री बंद केली आहे.

यासंदर्भात राष्ट्रप्रेमींनी निषेध नोंदवला असता ब्रेव्ह न्यू लूकच्या वतीने लेगिंग्जवर ध्वज असल्याने कशा प्रकारे अवमान होतो, ते सांगा. लोकांनी त्यांच्या देशाप्रतीचा अभिमान दाखवण्यासाठी ते परिधान केले पाहिजे, अशा प्रकारे ट्वीट करण्यात आले होते. त्यावर गोव्यातील गोवा क्रॉनिकल संकेतस्थळाचे संपादक सावियो रॉड्रिग्ज यांनी रिट्वीट करून आम्ही सुचवले आहे. पुढील भाग आमचे अधिवक्ते पहातील. तुम्ही संविधान वाचा, असे सुनावले. त्यानंतर ब्रेव्ह न्यू लुकने संकेतस्थळावरून त्या लेगिंग्ज हटवल्या असल्याचे लक्षात आले आहे.