बेंगळुरू येथील शाळेत चिनी नववर्ष साजरे करण्याचे नियोजन पालकांच्या विरोधानंतर रहित !

बेंगळुरू – येथील दिल्ली पब्लिक स्कूलने ३ ऑगस्ट या दिवशी अध्यादेश काढत ११ ऑगस्टला चिनी नववर्ष साजरे करण्याची घोषणा केली होती. यामध्ये इयत्ता पहिलीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना चीनचा पारंपरिक वेश परिधान करून येण्यास सांगण्यात आले होते. यासह नूडल्स, मोमोज, फ्राइड राइस आणि मन्चूरियन इत्यादी चिनी पदार्थही आणण्यास सांगितले होते. या दिवशी शाळेमध्ये विविध चिनी पारंपरिक कार्यक्रम, फूड फेस्टिव्हल, चिनी संस्कृतीची चित्रे बनवण्याची स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार होते. तसेच यासाठी विद्यार्थ्यांना सजावटीचे साहित्यही आणण्यास सांगितले होते. याला विद्यार्थ्यांच्या पालकांनी केलेल्या विरोधानंतर हा कार्यक्रम रहित करण्यात आला. त्यामुळे ११ ऑगस्टला तो साजरा केला गेला नाही. (मुळात हा कार्यक्रम साजरा करण्याचा विचार केल्याप्रकरणी या शाळेतील संबंधितांना शिक्षाच करायला हवी ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now