स्वातंत्र्यदिनी मदरशांत स्वातंत्र्यदिन साजरा करून चित्रीकरण करा ! – उत्तरप्रदेश सरकारचा आदेश

मदरसे राष्ट्रप्रेमी आहेत, तर त्यांना या आदेशाविषयी वाईट वाटायला नको !

देशातील अनेक मदरशांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही आणि राष्ट्रध्वज फडकवला जात नाही. तसेच काही मदरशांतून जिहादी आतंकवादी घडल्याचेही उघडकीस आले आहे, अशा वेळी उत्तरप्रदेश सरकार अशा प्रकारचा आदेश देत असेल, तर ती राष्ट्राभिमान्यांसाठी आनंदाचीच गोष्ट आहे !

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशच्या मदरशांमध्ये स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय ध्वज फडकावून राष्ट्रगीत गाण्याचा आदेश मदरसा शिक्षण परिषदेने दिला आहे. या सगळ्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करणे आणि छायाचित्रे काढणेही बंधनकारक करण्यात आले आहे. या चित्रीकरणाचा उपयोग भविष्यात चांगल्या कार्यक्रमाची पुनरावृत्ती करण्यासाठी होईल, असे या आदेशात म्हटले आहे. असे आदेश देणे म्हणजे आमच्या देशभक्तीवर संशय घेण्यासारखे आहे, असे मदरशांच्या संचालकांनी म्हटले आहे. देशात प्रथमच एखाद्या राज्याकडून अशा प्रकारचा आदेश देण्यात आला आहे.

मदरसा शिक्षण परिषदेने ३ ऑगस्टला जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण अधिकार्‍यांना पत्रे पाठवली आहेत. मदरशांमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमाची रूपरेषा यात नमूद करण्यात आली आहे. तसेच त्यानुसारच कार्यक्रम घेणे बंधनकारक आहे.

या चित्रीकरणाचा उपयोग भविष्यात चांगल्या कार्यक्रमाची पुनरावृत्ती करण्यासाठी होईल, असे पत्रात नमूद आहे. उत्तरप्रदेशमधील ८ सहस्र मदरसे उत्तरप्रदेश मदरसा परिषदेत येतात. यातील ५६० मदरसे संपूर्णपणे सरकारी अनुदानावर चालतात. मदरसा प्रबंधक हाजी सैयद तहव्वर हुसैन यांनी या आदेशावर म्हटले आहे की, स्वातंत्र्याच्या युद्धात मदरशांनी सहभाग घेतला होता; तरीही त्यांच्याकडे सरकार संशयाने पहात आहे.


Multi Language |Offline reading | PDF