वाराणसी येथील धर्माभिमानी अधिवक्ता त्रिपाठी यांच्यावर अज्ञाताकडून आक्रमण करण्याचा प्रयत्न

वाराणसी – अतिसुरक्षित आणि अतिसंवेदनशील असलेले लाल बहाद्दूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ, बाबतपूूर येथे ४ ऑगस्ट या दिवशी अज्ञात हल्लेखोराने धर्माभिमानी अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांच्यावर चारचाकी वाहनातून ओढून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. आक्रमणकर्त्याला पोलिसांनी कह्यात घेतले; मात्र तो पोलिसांच्या तावडीतून पळून गेला. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी घटनेच्या परिसरातील सीसीटीव्हीतील चित्रफीत पाहून फूलपूर पोलिसांना आरोपींवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. (उत्तरप्रदेश पोलिसांची कार्यक्षमता ! असे पोलीस आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई कशी करतील ? – संपादक)

अधिवक्ता त्रिपाठी यांच्यानुसार त्यांना आक्रमणकर्त्याचे नाव अज्ञात आहे. तो टाटा आस्थापनाच्या टॅगो चारचाकी वाहनातून आला होता. त्याने विमानतळाच्या जवळ त्रिपाठी यांना कारमधून ओढून त्यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. यातून त्यांनी स्वत:ला वाचवले. त्यानंतर ते विमानतळाच्या परिसरात गेले. तेथेही आक्रमणकर्ता त्यांचा पाठलाग करत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्रिपाठी यांनी १०० क्रमांकावरून उत्तरप्रदेश पोलिसांना दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही मिनिटांतच पोलीस घटनास्थळी पोहोचलेे. पोलिसांनी आक्रमणकर्त्याला अटक करून त्याला पोलीस ठाण्यात नेले. तेथून आक्रमणकर्ता पोलिसांच्या तावडीतून पसार झाला. या कालावधीत आक्रमणकर्त्याने त्याच्या स्थानिक सहकार्‍यांना बोलावून घेतले होते. त्याचे वाहन विनाक्रमांकाचे असल्याचे सांगण्यात येते. या घटनेच्या विरोधात अधिवक्ता त्रिपाठी यांनी त्यांच्या सहकारी अधिवक्त्यांच्या समवेत वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now