ब्रेव्ह न्यू लूक आस्थापनाकडून भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र असणार्‍या लेगिंग्जची ऑनलाईन विक्री

हे चित्र छापण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नसून त्यांना विडंबन कळण्यासाठी चित्र छापण्यात आले आहे.

कॅलिफॉर्निया (अमेरिका) – सॅनफ्रॅन्सिस्को येथील ब्रेव्ह न्यू लूक या आस्थापनाने तिच्या संकेतस्थळावर भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र असलेल्या लेगिंग्ज (महिला वापरत असलेला एक प्रकारचा पायजमा) ऑनलाईन विक्रीसाठी ठेवल्या आहेत. यामुळे भारतियांच्या भावना दुखावल्याने त्यांनी याचा निषेध केला आहे.

राष्ट्रप्रेमी हिंदु पुढील संपर्कावर या आस्थापनाचा वैध मार्गाने निषेध करत आहेत.

इमेल : [email protected]

फेसबूक : facebook.com/ bravenewlook

ट्विटर : twitter.com/ bravenewlook

राष्ट्रद्रोही आणि हिंदुद्रोही घटनांचा संयत मार्गाने निषेध करा !

हिंदुद्रोह्यांचा निषेध करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचे वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कोणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्‍या व्यक्तीला तिच्या चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा व्यापक दृष्टीकोन निषेध व्यक्त करण्यामागे हवा !