हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना

‘राष्ट्र्रध्वजाचा मान राखा’ चळवळीसाठी प्रबोधनात्मक दृकश्राव्य (audio-visual) लघुपट उपलब्ध

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘राष्ट्र्रध्वजाचा मान राखा’ ही चळवळ राबवण्यात येते. या चळवळीसाठी ४.१५ मिनिटांचा ‘राष्ट्र्रध्वज सन्मान आंदोलन’ हा मराठी भाषेतील, तसेच २ मिनिटे कालावधीचा हिंदी, कन्नड, तमीळ, तेलुगु आणि मल्याळम भाषांतील प्रबोधनात्मक लघुपट सिद्ध करण्यात आले आहेत. हे लघुपट पुढील लिंकवरून डाऊनलोड करून घ्यावेत. या लघुपटांचे स्थानिक दूरचित्रवाहिनीद्वारे (केबल नेटवर्कद्वारे) प्रसारण करता येईल. तसेच शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये इत्यादी ठिकाणीही हे लघुपट दाखवता येतील. हे लघुपट व्हॉट्सअ‍ॅप प्रणालीद्वारे प्रसारित करण्यासाठी याच लिंकवर लहान आकारात ठेवण्यात आले आहेत.

 लिंक : https://goo.gl/yX4H7j