गणेशमूर्ती आणि गणेशोत्सवातील पूजाविधी यांविषयी अमूल्य माहिती देणारे ‘श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार असावी !’ अन् ‘श्री गणेश पूजाविधी’ हे लघुग्रंथ समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा !

सर्वत्रच्या साधकांना सूचना !

‘२५.८.२०१७ या दिवशी गणेशचतुर्थी आहे. त्या निमित्ताने साधकांना श्री गणेशाच्या संदर्भातील अध्यात्मशास्त्रीय ज्ञान देणारे सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि लघुग्रंथ समाजापर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली आहे. या ग्रंथांविषयीची माहिती पुढे दिली आहे.

१. श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार असावी !

सनातनच्या मूर्तीकार साधकांनी संकलित केलेल्या या लघुग्रंथात ‘श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी पुजावयाची मूर्ती कशी असावी ? सात्त्विक श्री गणेशमूर्तीमुळे कोणते लाभ होतात ?’, याचे विवेचन केले आहे. ‘शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती कशी असायला हवी ?’, याविषयीची माहिती या लघुग्रंथाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचल्यास त्यांना सात्त्विक श्री गणेशमूर्तीतील चैतन्याचा लाभ घेता येईल.

२४.७.२०१७ पासून श्रावण मासाला आरंभ झाला आहे. बहुतांश लोक गणेशोत्सवासाठी लागणार्‍या गणेशमूर्तीची मागणी मूर्तीकारांना श्रावण मासात देतात. त्यामुळे साधकांनी या लघुग्रंथाच्या वितरणासाठी अधिकाधिक प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

२. श्री गणेश पूजाविधी

या लघुग्रंथात श्री गणेशचतुर्थीच्या वेळची पूजा, पूजेतील विधी आणि काही मंत्र अर्थासह दिले आहेत. त्याचप्रमाणे ‘श्री गणेशाचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन कसे करावे ? पूजकाला श्री गणेशतत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी त्याने काय करावे ?’ आदी माहिती सविस्तर दिली आहे.

सर्वत्रच्या साधकांनी वरील ग्रंथ, तसेच ‘श्री गणपति (अध्यात्मशास्त्रीय ज्ञान) आणि ‘श्री गणेश अथर्वशीर्ष व संकष्टनाशनस्तोत्र’ हे लघुग्रंथ अन् ‘श्री गणपति’ हा ग्रंथ यांचे अधिकाधिक वितरण होण्यासाठी प्रयत्न करावेत.

बरेच उद्योगपती आणि दुकानदार गणेशचतुर्थीच्या निमित्ताने इतरांना भेटवस्तू देतात. त्यांना संपर्क करून सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि लघुग्रंथ भेट देण्यास सांगू शकतो.’