भारतीय सैन्य आव्हानांना तोंड देण्यास सक्षम ! – अरुण जेटली

सैन्य सक्षम आहेच; मात्र शासनकर्ते धाडस कधी दाखवणार ?

नवी देहली – भारताने गेल्या काही दशकांत अनेक आव्हाने पेलली आहेत. त्या प्रत्येक आव्हानातून देश अधिक सशक्तच झाला आहे. वर्ष १९६२ च्या चीन युद्धातून भारत अनेक धडे शिकला आहे. आजच्या काळातही देशाला शेजारी देशांकडून आव्हाने आहेत. वर्ष १९६२ मध्ये चीनने भारतावर युद्ध लादले होते त्यात बराच फटकाही बसला; पण वर्ष १९६५ आणि वर्ष १९७१ मध्ये पाकशी झालेल्या युद्धांत भारताचा विजय झाला. वर्ष १९४८ पासून जम्मू-काश्मीरचा जो भाग पाकने बळकावला आहे, तो परत कह्यात घेण्याची देशातील अनेकांची इच्छा आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत केले.


Multi Language |Offline reading | PDF