शांत, आनंदी आणि सात्त्विक गोष्टींची आवड असलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील चि. सान्वी म्हाडदळकर (वय १ वर्ष) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. सान्वी म्हाडदळकर एक आहे !

चि. सान्वी म्हाडदळकर

श्रावण कृष्ण पक्ष प्रतिपदा (८.८.२०१७) या दिवशी कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील चि. सान्वी राकेश म्हाडदळकर हिचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आजीला मुलीच्या गर्भारपणात जाणवलेली सूत्रे आणि नात चि. सान्वी हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. सान्वी हिला सनातन परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !

१. मुलीने विवाहापूर्वी नियमित आणि विवाहानंतर प्रासंगिक सेवा करणे  ‘माझी मुलगी सौ. रिद्धि म्हाडदळकर (पूर्वाश्रमीची कु. कोमल वारखणकर) ही विवाहापूर्वी प्रसारासाठी जाणे आणि ग्रंथप्रदर्शन लावणे, अशा सेवा करत होती, तसेच ती रामनाथी आश्रमातील साधक-रुग्णांची तपासणी करत होती. विवाहानंतर तिचा सेवेचा भाग अल्प झाला. विशेष उपक्रम असेल, तर ती सेवेला जात असे.

२. मुलीचे गर्भारपण 

२ अ. मुलीने गर्भधारणा झाल्यापासून स्तोत्रे, नामजप, संतांची चरित्रे आणि सात्त्विक भजने ऐकणे : रिद्धीला गरोदरपणात कोणताच शारीरिक त्रास झाला नाही. गर्भधारणा झाल्यापासून ती स्तोत्रे, नामजप आणि सात्त्विक भजने ऐकत असे. तेव्हा ‘तिचे बाळ शांतपणे ऐकत आहे’, असे मला जाणवत असे. कधी तिच्या पोटात बाळाची हालचाल अधिक होत असेल, तर तिने पोटावर हात ठेवून रामरक्षा म्हटल्यावर बाळाची हालचाल थांबत असे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची शिकवण; विठ्ठल पुराण, शिवपुराण, रामायण, महाभारत; साईबाबांच्या कथा; ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र, प्रवचन; प.पू. भक्तराज महाराज अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरित्र इत्यादी सर्व ग्रंथ मी तिला वाचून दाखवत असे.

२ आ. मुलीला संतांचा प्रसाद आणि आशीर्वाद मिळणे : रिद्धीला प.पू. परुळेकर महाराज, प.पू. घडशी महाराज आणि प.पू. दास महाराज यांनी प्रसाद अन् आशीर्वाद दिले होते. गरोदरपणाच्या चौथ्या मासात (महिन्यात) रिद्धीने गोपूजन केले होते.

३. मुलीची प्रसूती  रिद्धीची प्रसूती पुष्कळ त्रासदायक झाली. ‘प.पू. गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेने तिचा पुनर्जन्म झाला’, असे मला वाटतेे. तिला मुलगी झाली. मुलीला पाहिल्यावर मला हलके वाटले.

४. जन्म ते ३ मास (महिने) 

४ अ. नामजप आणि संत भक्तराज महाराज यांची भजने लावल्यावर रडणे बंद होऊन त्वरित हसणे : पहिल्या दिवसापासून मी चि. सान्वीच्या अंथरुणावर नामजपाचे मंडल घालण्यास आरंभ केला. मी तिला श्री दुर्गाकवच, श्रीरामरक्षा स्तोत्र, संत भक्तराज महाराज यांची भजने आणि नामजप ऐकवत असे. मांडीवर घेऊन नामजप करतांना ती सतत आनंदी असेे. नामजप आणि संत भक्तराज महाराज यांची भजने लावल्यावर तिचे रडणे बंद होऊन ती त्वरित हसत असे. आताही तिला बरे नसले किंवा तिचे रडणे चालूू झाले की, मी तिला नामजप, भजन आणि स्तोत्रे ऐकवते. तेव्हा ती त्वरित शांत होते आणि हसते.

५. ४ ते ७ मास 

५ अ. देवतांच्या नामपट्ट्या, श्रीकृष्णाचे चित्र आणि संत भक्तराज महाराज यांचे छायाचित्र यांकडे पाहून सान्वीने हसणे आणि बोलणे : सान्वी चार मासांची असतांना श्री दुर्गादेवीची नामपट्टी पाहून पुष्कळ हसत असे. ती पाच मासांची असतांना खोलीतील श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून हसत आणि बोलत असे. ती त्या चित्राकडे एकटक पहात असे. सान्वी ६ – ७ मासांची असतांना स्वयंपाकघरातील श्रीकृष्णाच्या नामपट्टीकडे पाहून पुष्कळ बोलत आणि खेळत असे. संत भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहून ती हसत असे.

५ आ. रामरक्षा म्हणण्यास आरंभ केला की, प्रथम हसत असे आणि नंतर शांत होऊन रामरक्षा ऐकत असे. 

६. १० ते १२ मास 

६ अ. शांत स्वभाव

१. सान्वी १० मासांची असतांना तिची शांती करण्यासाठी आम्ही नृसिंहवाडी येथे गेलो होतो. विधी चालू झाल्यापासून तो संपेपर्यंत ती मांडीवर शांत बसली होती.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या वेळी मी सान्वीला थोडा वेळ कुडाळ येथील सेवाकेंद्रात नेले होते. तेव्हाही ती शांत होती.

६ आ. हसतमुख आणि आनंदी : ‘श्री कुठे ? कृष्णबाप्पा कुठे ?’, असे सान्वीला विचारल्यावर ती जोरात हसते. ती क्वचितच रडते. ती चिडचिड करत नाही आणि त्रासही देत नाही. भूक लागल्यावर ती न रडता खेळत असते. ती नेहमी हसतमुख आणि आनंदी असते.

७. कृतज्ञता आणि प्रार्थना : ‘प.पू. गुुरुमाऊली, भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने सात्त्विक बाळाचा जन्म झाला. त्याविषयी आम्ही तुमच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत.  ‘कु. सान्वीची साधना तुम्हीच करवून घ्या’, अशी आपल्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना करते.

८. चि. सान्वीमधील स्वभावदोष : जेवतांना हट्टीपणा करणे’- सौ. सुप्रिया वारखणकर (चि. सान्वीची आजी), कुडाळ, जि. सिंधुदुर्ग. (१०.७.२०१७)

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.


Multi Language |Offline reading | PDF