नान्नज (जिल्हा नगर) येथे मंदिरातील मूर्तींची तोडफोड

असुरक्षित मंदिरे ! हिंदू संघटित नसल्यामुळेच त्यांच्या श्रद्धास्थानांवर वारंवार आघात करण्याचे धाडस धर्मद्रोह्यांकडून होते. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !

नान्नज (तालुका जामखेड) – छोटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोपाळपुरा भागातील मंदिरातील दत्तगुरु, गणपति आणि नंदी या मूर्तींची तोडफोड झाल्याची घटना ६ ऑगस्टला उघडकीला आली. या प्रकरणी पुजार्‍यांच्या तक्रारीवरून जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ग्रामस्थांनी बंद पाळत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

१. ६ ऑगस्टला सकाळी मंदिराचे पुजारी श्री. सोमनाथ क्षीरसागर नेहमीप्रमाणे पूजा करण्यासाठी गेल्यावर तेथील श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीचा हात, गणपति मंदिरातील गणपतीच्या मूर्तीच्या डाव्या हाताचे बोट आणि तेथीलच शिवमंदिरातील नंदीचे कान यांची तोडफोड झाल्याचे लक्षात आले.

२. ५ ऑगस्टला रात्री मंदिराचे कुलुप तोडून मूर्तीवर धारदार शस्त्राने आघात करण्यात आल्याचा संशय आहे.

३. विटंबना झालेल्या मूर्ती पालटून त्या ठिकाणी संबंधित देवतांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या आहेत.


Multi Language |Offline reading | PDF